World Athletics Championships Neeraj Chopra  esakal
क्रीडा

Neeraj Chopra : नीरज सर्वात अव्वल, भारताचे तीन भालाफेकपटू अंतिम फेरीत

अनिरुद्ध संकपाळ

World Athletics Championships Neeraj Chopra : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये आज भारताचा पुरूष भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रा (88.77 मीटर), किशोर जेना (80.75 मीटर) आणि डीपी मनू (81.31) या तीनही भालाफेकपटूंनी फायनलमध्ये प्रवेश केला.

भारतासोबतच पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम (86.79 मीटर) याने देखील अंतिम फेरी गाठली. तो ग्रुप B मध्ये अव्वल राहिला तर भारताचा नीरज चोप्रा हा ग्रुप A मध्ये अव्वल स्थानावर राहिला. आता पुरूष भालाफेकीची अंतिम फेरी ही 27 ऑगस्टला होणार आहे.

 पाकिस्तानचा नदीम झालाफायनलसाठी पात्र 

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 86.89 मीटर लांब भाला फेकून ग्रुप B मध्ये अव्वल स्थान पटकावले. याचबरोबर तो फायलनसाठी पात्र देखील झाला. त्याच्या जोडीने ग्रुप B मधून वडलेच देखील 83. 50 मीटर भालाफेक करून फायनलसाठी पात्र झाला आहे.

ग्रुप B मध्ये जेनाचा पहिला प्रयत्न 

ग्रुप B मध्ये समाविष्ट असलेल्या भारताच्या किशोर जेनाने पहिल्या प्रयत्नात 80.75 मीटर लांब भाला फेकला.

नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठीही झाला पात्र

नीरज चोप्राने आपल्या एकच 88.77 मीटर लांब भालाफेकीत जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपदस्पर्धेची फायनल गाठली आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी देखील तो पात्र झाला आहे.

डीपी मनू सध्या तिसऱ्या स्थानावर

ग्रुप A मधील भारताचा दुसरा भालाफेकपटू डीपी मनूने दुसऱ्या फेरीत 81.31 मीटर लांब भाला फेकला. तो सध्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. मात्र फायनलचा पात्रता मार्क हा 83 मीटर आहे.

नीरजच्या सुवर्ण पदकाचा मार्ग मोकळा? 

गेल्या दोन जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या अँडरसन पीटर्सचे पहिले दोन प्रयत्न त्याच्या लौकिकास साजेसे राहिले नाहीत. त्याने पहिल्या प्रयत्नात 78.02 मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात 77.51 मीटर लांब भाला फेकला. गेल्या स्पर्धेत त्याने 90.54 मीटर लांब भाला फेकत सुवर्ण पदक पटकावले होते.

किशोर जेनाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी

भारताचा तिसरा भालाफेकपटू किशोर जेनाचा ग्रुप B मध्ये समावेश आहे. त्याची वैयक्तिक आणि हंगामातील सर्वोत्तम कामगिरी 84.38 मीटर इतकी आहे.

मनुचा पहिला प्रयत्न 

ग्रुप A मधील भारताचा दुसरा भालाफेकपटू मनुने 78.10 मीटर भालाफेक केली.

ग्रुप A मधील नीरजचा पहिला प्रयत्न 

नीरज चोप्राने ग्रुप A मधील आपल्या पहिल्या प्रयत्नात 88.77 मीटर लांब भालाफेक करत हंगामातील आपली सर्वात चांगली कामगिरी केली. तो आत ग्रुप A मध्ये पहिल्या स्थानावर आला आहे. याचबरोबर तो फायनलसाठी पात्र होणारा पहिला भालाफेकपटू देखील ठरला.

83 मीटर थेट पात्रता निकष

जागितक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुरूष भालाफेक पात्रता फेरीत 83 मीटर भालाफेक केल्यानंतर ते थेट पात्र होणार आहेत. नीरज चोप्राने यंदाच्या हंगामात दोहा डायमंड लीग स्पर्धेत 88.67 मीटर लांब भाला फेकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : नीटची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT