Neeraj Chopra sakal
क्रीडा

Neeraj Chopra : नीरजचा तीन वर्षांनंतर मायदेशातील स्पर्धेत सहभाग ; भुवनेश्वर येथे रविवारपासून होत असलेल्या फेडरेशन करंडक स्पर्धेत खेळणार

ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता व विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर मायदेशातील स्पर्धेत सहभागी होत आहे. येत्या १२ तारखेपासून भुवनेश्वर (ओडिशा) येथे होत असलेल्या २७व्या फेडरेशन करंडक स्पर्धेत हरियानाने नीरजची प्रवेशिका पाठवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता व विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर मायदेशातील स्पर्धेत सहभागी होत आहे. येत्या १२ तारखेपासून भुवनेश्वर (ओडिशा) येथे होत असलेल्या २७व्या फेडरेशन करंडक स्पर्धेत हरियानाने नीरजची प्रवेशिका पाठवली आहे. नीरजप्रमाणे किशोर जेना, डी.पी. मनू हे अन्य दोन भालाफेकपटूही सहभागी होत आहेत.

भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने बुधवारी सहभागी खेळाडूंची नावे जाहीर केली. तीन वर्षांपूर्वी पतियाळा येथे झालेली फेडरेशन करंडक स्पर्धा नीरजची मायदेशातील शेवटची स्पर्धा होती. या स्पर्धेत त्याने ८७.८० मीटर भाला फेकून नवीन स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला होता. हा विक्रम अद्याप कायम आहे. तीन वर्षांपासून तो विदेशातच सराव करीत आहे. तिथूनच तो थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत होता.

भुवनेश्वर येथे दाखल होण्यापूर्वी तो १० मे रोजी दोहा येथे होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत किशोर जेनासोबत सहभागी होत आहे. भुवनेश्वरचे मैदान नीरजसाठी नवीन नाही. २०१७ मध्ये येथे झालेल्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत त्याने स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते.

पॅरिस ऑलिंपिकसाठी ८५.५० मीटर अशी पात्रता असून नीरजप्रमाणेच किशोरने यापूर्वीच पात्रता गाठली आहे. किशोरने गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकताना ८७.५४ मीटर अशी फेक करीत पात्रता गाठली होती.

ऑलिंपिकच्या सुवर्णपदकाचा यंदा बचाव करणे हे माझे लक्ष्य असले तरी, ९० मीटर अंतरापेक्षा अधिक अंतरावर भाला फेकणे माझ्यासाठी आणखी विशेष आहे.

- नीरज चोप्रा

भुवनेश्वर येथे भालाफेक

  • एकूण स्पर्धक २४

  • पात्रता स्पर्धा

  • १४ मे - सकाळी ७.१५ (ग्रुप अ), सकाळी ८.२० (ग्रुप ब)

  • अंतिम फेरी

  • १५ मे - रात्री ७ वाजता

  • प्रमुख स्पर्धक

  • नीरज चोप्रा (हरियाना), किशोर जेना (ओडिशा), डी. पी. मनू (कर्नाटक), शिवपाल सिंग (उत्तर प्रदेश), विकास यादव (उत्तर प्रदेश), रोहित कुमार (दिल्ली), उत्तम पाटील (महाराष्ट्र).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

NEET Success Story: पंक्चर काढणाऱ्या वडिलांचा मुलगा डॉक्टर होणार! साहिलने नीटमध्ये मिळवले ५३० गुण; संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

'महाराष्ट्र माझी जन्मभूमी' म्हणत राणी मुखर्जीनं मराठीत केली भाषणाची सुरुवात, हिरव्या साडीतील मराठमोळ्या लूकने जिंकली मनं; Viral Video

Marathi News Live Updates : लोहगावमध्ये रस्त्यावरील खड्ड्याला चक्क चिकटपट्टी लावून पुणेकराचे अनोखे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा जाहीर निषेध

SCROLL FOR NEXT