kho kho competition esakal
क्रीडा

Kho Kho Competition : नेरूरकर करंडक खो-खोत पुण्याला दुहेरी मुकुट

भाई नेरूरकर करंडक खो-खो स्पर्धेत किशोर-किशोरी गटात यजमान सांगलीने दुहेरी मुकुटाचा मान मिळवला; तर पुरुष आणि महिला या सिनियर गटात पुण्याचे दुहेरी यश साध्य केले.

सकाळ वृत्तसेवा

कुपवाड (सांगली) - भाई नेरूरकर करंडक खो-खो स्पर्धेत किशोर-किशोरी गटात यजमान सांगलीने दुहेरी मुकुटाचा मान मिळवला; तर पुरुष आणि महिला या सिनियर गटात पुण्याचे दुहेरी यश साध्य केले.

महिला गटात पुण्याने धाराशिवला (११-१०) ४.१० मिनिटे राखून १ गुणाने मात केली. पुण्याकडून प्रियांका इंगळे (२.४०, २.१० मि. संरक्षण व ४ गुण), कोमल धारवाडकर (२, १ मि. संरक्षण), काजल भोर यांनी पुण्याच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

पुरुष गटात अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरवर (२०-१०) अशी १० गुणांनी सहज मात केली. या विजयात पुण्याकडून खेळताना आदित्य गणपुले (२.३०, १.१० मि. संरक्षण व ५ गुण), शुभम थोरात (२.४० मि. संरक्षण), सुयश गरगटे (२, १ मि. संरक्षण व २ गुण) यांनी मोलाची कामगिरी केली. मुंबई उपनगरकडून अनिकेत चेंदणकर, ऋषिकेश मुरचावडे यांनी प्रतिकार केला.

किशोरींच्या अंतिम सामन्यात यजमान सांगलीने धाराशिवचा (२५-२२) ३ गुणांनी पराभव केला; तर किशोर गटात सांगलीने ठाण्याचा लघुत्तम आक्रमणापर्यंत रंगलेल्या सामन्यात मात केली. सांगलीकडून रितेश भालदार (१.३०,१.५० व १ मि. संरक्षण व ४ गुण), संग्राम डोबळे (२, १, ३ मि. संरक्षण) यांनी दमदार खेळ केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT