India at Paris Olympic Opening Ceremony Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: 'मुंबईत अशी साडी २०० रुपयांना मिळते...', उद्घाटन सोहळ्यातील भारताच्या आऊटफिट डिझाईनरवर नेटिझन्स कडाडले

Indian athletes outfits for Paris Olympic 2024 Opening Ceremony: पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय संघाने परिधान केलेल्या पोषाखाच्या डिझायनरवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

Pranali Kodre

Indian athletes outfits for Paris Olympic 2024 Opening Ceremony: शुक्रवारी (२६ जुलै) रात्री पॅरिसमधील प्रसिद्ध सीन नदीकाठी ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या स्पर्धेत जगभरातील देशांच्या संघांचे बोटीतून संचलन झाले. यामध्ये भारतीय संघाचाही समावेश आहे.

भारतीय संघ पारंपारिक वेशात या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाला होता. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल भारताचे ध्वजधारक होते.

या सोहळ्यासाठी भारतीय संघाचा पोशाख डिझायनर तरुण ताहिलानीने डिझाईन केला होता. यातून भारतीय संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला होता. भारताची समृद्ध परंपरा दाखवण्यासाठी नॅचरल फॅब्रिकपासून हा पोषाख तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

भारतीय पुरुष खेळाडूंसाठी पांढरा कुर्ता आणि त्यावर बंडी जॅकेट असा पोषाख होता. बंडीच्या किनाऱ्यांवर भारतीय राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा वापर करून नक्षीकाम करण्यात आले होते. तसेच खिश्यावर देशाचं नाव आणि ऑलिम्पिक लोगो होता.

भारतीय महिला खेळाडूंची साडी पांढऱ्या रंगाची होती. साडीच्या किनारीला आणि ब्लाऊजला इकत प्रिंटसारखी डिझाईन होती. ही डिझाईन राष्ट्रध्वजातील तीन रंग छटांमध्ये करण्यात आलेली होती.

दरम्यान, या पोषाखातील भारतीय संघाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र डिझायनर तरुण ताहिलानीला बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले.

एका सोशल मिडिया युझरने लिहिले, 'हॅलो तरुण ताहिलानी! तुम्ही डिझाईन केलेल्या या पोषाखापेक्षा चांगल्या साड्या मी मुंबईच्या रस्त्यांवर २०० रुपयांना विकल्या जाताना मी पाहिल्या आहेत. स्वस्त पॉलिस्टरसारखे फॅब्रिक, इकत प्रिंट!'

'तिरंग्याचे रंग कोणताही विचार न करता वापरल्यासारखे वाटतात. तुम्ही हे एखाद्या इंटर्नला सांगितलं होतं का की डेडलाईनच्या ३ मिनिट आधी आलेली ही आयडिया होती. भारताच्या समृद्ध विणकाम संस्कृती आणि इतिहासाचा हा अपमान आहे.'

याशिवाय देखील अनेक सोशल मिडिया युजर्सने डिझायनरवर टीका केली होती.

दरम्यान जीक्यू इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ताहिलानीने सांगितलं होतं की त्यांनी केलेल्या संशोधनातून असं लक्षात आलेलं की ऑलिम्पिकमधील गणवेश खेळाडूंच्या देशाचा आणि राष्ट्रध्वजाचा विचार करून केला जातो.

त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी ऑलिम्पिकसाठी भारताचा पोषाख तयार केला होता. ज्यात राष्ट्रध्वजाच्या तिन्ही रंगांचा वापर करण्यात आला होता. त्याचबरोबर त्याने असंही सांगितलेलं की त्याचे वडील रोज बंडी घालायचे, त्यातून प्रेरणा घेऊन त्याने बंडीचाही वापर या पोषाखात केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT