बजरंग पुनिया sakal
क्रीडा

New Delhi : आंदोलनाचा राजकीय वापर नको ; बजरंग पुनिया

आमच्या आंदोलनाचे व्यासपीठ राजकीय फायद्यासाठी कोणाला करू देणार नाही,

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आमच्या आंदोलनात काही जण उपस्थित राहत आहेत त्यांच्या हेतूमुळे हे आंदोलन वेगळ्या दिशेला जात आहे, असे वक्तव्य धरणे आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंतील बजरंग पुनिया याने केले, परंतु या व्यक्ती कोण हे मात्र स्पष्ट केले नाही.

आमच्या आंदोलनाचे व्यासपीठ राजकीय फायद्यासाठी कोणाला करू देणार नाही, असे सांगून बजरंग पुनिया पुढे म्हणतो, काही जणांमुळे आमच्या आंदोलनाला वेगळी दिशा मिळत आहे. ही लढाई देशाच्या मुलींना सन्मान मिळण्यासाठी आहे. आंदोलनाचा फायदा कोण घेत आहे या प्रश्नावर मात्र बजरंगने मौन बाळगले.

आंदोलनात बाहेरचे अनेक जण जंतरमंतर येथे उपस्थित राहत आहेत आणि त्यातील काही जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करत आहेत. त्या लोकांबाबत बजरंग आक्षेप घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

आंदोलनाच्या जागेवर असेही काही लोक येत आहेत, जे आमच्या विरोधात घोषणा देत आहेत, परंतु आम्ही भारतीय कुस्ती वाचवण्यासाठी लढा देत आहोत; तर काही लोक राजकीय फायदा घेत आहेत, असे सांगून बजरंग पुढे म्हणाला, राजकाण दुय्यम आहेत, महिला खेळाडूंचा सन्मान हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे या आंदोलनात राजकारण आणू नका, हा खेळाडूंचा लढा आहे, तो खेळाडूंसाठी राहु द्या.

आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्यावा, अशी मागणी बजरंग आणि इतर कुस्तीपटूंनी केली होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी, भूपिंदर सिंग हुडा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, जयंत चौधरी, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्य पाल मलिक आदी राजकीय व्यक्तींनी आंदोलनात उपस्थिती लावलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT