devon conway
devon conway Twitter
क्रीडा

WTC : भाऊ खेळपट्टीवर 'कचरा' टाकून करतोय प्रॅक्टिस!

सुशांत जाधव

भारत (Indian Cricket Team) आणि न्यूझीलंड (new zealand cricket team) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC )रंगणार आहे. इंग्लंडमधील साउहॅम्टनच्या मैदानात 18 जूनला होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. न्यूझीलंड संघाचा फलंदाज ड्वेन कॉन्वे (devon conway) हा तर एका वेगळ्याच अंदाजात भारताविरुद्धच्या सामन्याचा सराव करतोय. भारतीय फिरकीसमोर 'कचरा' होऊ नये, यासाठी त्याने अनोखी शक्कल लढवली आहे. खेळपट्टीवर कचरा टाकून कॉन्वे प्रॅक्टिस करत आहे. याचा फिरकीविरुद्ध खेळण्यास फायदा होईल, असे त्याला वाटते. (new zealand batsman devon conway hopes warms up for india with kitty litter on pitch world test championship final)

29 वर्षीय डावखुरा फलंदाज ड्वेन कॉन्वे इंग्लंड दौऱ्यावर कसोटी पदार्पण करण्याची शक्यता आहे. खेळपट्टीवर कचरा टाकून खेळण्यासंदर्भात कॉन्वे म्हणाला की, जर बॉल रफ जागेवर पडला तर तो खेळण्यात अडचण येऊ नये, यासाठी हा खटाटोप करत आहे. हा प्रयोग भारतीय फिरकीविरोद्ध खेळताना फायदेशीर ठरले, असा विश्वासही त्याने व्यक्त केलाय. कचरा टाकलेल्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूप कठीण आहे. पण यामुळे चांगली प्रॅक्टिस होते. एक गेम प्लॅन यशस्वी करण्याच्या उद्देशाने प्रॅक्टिस करत आहे, असे तो म्हणाला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. 2 जून पासून लंडनच्या मैदानात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. 10 जूनला बर्मिंघमच्या मैदानात या दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना रंगेल. कॉन्वेच्या दमदार कामगिरीनंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्याला 20 खेळाडूंच्या करार यादीत स्थान दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT