Glenn Phillips Non Strike Run Out Unique Trick  esakal
क्रीडा

Glenn Phillips : न्यूझीलंडच्या फिलिप्सने 'मंकडिंग' चुकवण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल; VIDEO व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Glenn Phillips Non Strike Run Out Unique Trick : टी 20 वर्ल्डकप 2022 मधील आजच्या (दि.29) सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 65 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने खराब सुरूवातीनंतर 20 षटकात 7 बाद 167 धावांपर्यंत मजल मारली. यात ग्लेन फिलिप्सच्या झुंजार 102 धावांच्या शतकी खेळीचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर ट्रेट बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19.2 षटकात 102 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. न्यूझीलंडने 65 धावांनी सामना जिंकत गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान बळकट केले. दरम्यान, सोशल मीडियावर शतकवीर ग्लेन फिलिप्सचा एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने न्यूझीलंडची अवस्था 3 बाद 15 धावा अशी केली होती. मात्र त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि डॅरेल मिचेलने चौथ्या विकेटसाठी 84 धावांची झुंजार भागीदारी रचत संघाला शतकाच्या जवळ पोहचवले. त्यानंतर अर्धशतक पूर्ण केलेल्या ग्लेन फिलिप्सने आक्रमक फलंदाजी करत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. दरम्यान, फिलिप्सने टी 20 वर्ल्डकपमधील आपले पहिले शतक देखील साजरे केले.

शेवटच्या षटकात फलंदाजी करत असताना फिलिप्स नॉन स्ट्राईक रन आऊटपासून वाचण्यासाठी एक भन्नाट कल्पना लढवली. त्याने अॅथलेटिक्समधील स्प्रिंटर ज्या प्रकारे आपली रेस सुरू करण्यापूर्वी गार्ड घेतात तसे गार्ड घेतले. गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर तो वेगाने धावत सुटला. दरम्यान, फिलिप्सने नॉन स्ट्राईक रन आऊट होण्यापासून तुम्ही कसे वाचू शकता याचे तंत्रच जगासमोर ठेवले.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. टी 20 वर्ल्डकप 2022 च्या ग्रुप 1 मधील सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 65 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडने सुपर 12 फेरीच्या ग्रुप 1 मध्ये 5 गुणांसह आपले अव्वल स्थान अजून बळकट केले. तर श्रीलंका तीन सामन्यानंतर दोन गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि आयर्लंड यांचे प्रत्येकी 3 गुण झाले आहेत. इंग्लंड दुसऱ्या, आयर्लंड तिसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Bomb Attack : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या शिया मशिदीत नमाजवेळी आत्मघाती हल्ला; ७० जणांचा मृत्यू, १७० हून अधिक जखमी

ZP Elections 2026 Voting Live Update : राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान

नोवाक जोकोविच... युद्धजर्जर बालपणातून फुललेली भरजरी कारकीर्द

Satara Accident:मोटार-दुचाकी अपघातात भिलारच्या तरुणाचा मृत्यू; पाचगणी- महाबळेश्वर रस्त्यावर भीषण अपघात, क्षणात काय घडलं?

Valentine Week Horoscope Marathi: या व्हॅलेंटाईन वीकमध्ये कोणाच्या प्रेमाला मिळणार हिरवा कंदील? जाणून घ्या १२ राशींची प्रेमकहाणी

SCROLL FOR NEXT