Aus vs Nz sakal
क्रीडा

Aus vs Nz ICC T20 World Cup : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाची शरणागती

टी-२० विश्वकरंडक : न्यूझीलंडचा सलामीला सनसनाटी विजय

सकाळ वृत्तसेवा

सिडनी : गतवेळच्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवाची सव्याज परतफेड न्यूझीलंडने केली. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला आता त्यांच्याच भूमीत तब्बल ८९ धावांनी दणदणीत पराभव करून यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट मुख्य स्पर्धेत सनसनाटी सुरुवात केली.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३ बाद २०० अशी भक्कम धावसंख्या उभारली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला १७.१ षटकांत १११ धावांत शरण आणले. आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचे ना गोलंदाज चमक दाखवू शकले ना फलंदाज आव्हानाचा स्वीकार करू शकले.

अलेनने दाखवली दीशा

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या गेल्या काही सामन्यांतील कामगिरीनुसार ऑस्ट्रेलियाचे पारडे निश्चिच जड होते, पण फिन अलेनच्या हल्ल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज सैरभैर झाले. त्यानंतर संपूर्ण सामन्यात त्यांची अवस्था कायम राहिली. अलेन १६ चेंडू खेळला, पण त्यात त्याने फटकावलेल्या ४२ धावा विश्वकरंडक स्पर्धेसाठीही दिशादर्शक ठरल्या.

मिशेल मार्शच्या पहिल्याच षटकात अलेनने १४ धावा फटकावल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया कर्णधार फिन्चला पहिल्या चार षटकांत चार वेगवेगवेळ गोलंदाज वापरावे लागले. अखेर हेझलवूडने पाचव्या षटकात अलेनचा झंझावात रोखला, पण तोपर्यंत न्यूझीलंडसाठी ५६ धावांची भक्कम पायाभरणी झाली होती. अलेनचा स्ट्राईक रेट २४६ चा होता. खरे तर या झंझावाती सुरुवातीनुसार न्यूझीलंडने २२५ धावा तरी करायला हव्या होत्या, परंतु केन विल्यम्सन २३ चेंडूत २३ आणि ग्लेन फिलिप्स १० चेंडूत १२ यांच्या संथ फलंदाजीमुळे ब्रेक लागले; मात्र व दुसरा सलामीवीर डेव्हन कॉन्वे आणि नीशम यांनी अखेरच्या षटकांत वेग वाढवला, त्यामुळे न्यूझीलंडला २०० धावा करता आल्या.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : २० षटकांत ३ बाद २०० (फिन अलेन ४२- १६ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार, डेव्हन कॉन्वे नाबाद ९२- ५८ चेंडू, ७ चौकार, २ षटकार, केन विल्यम्सन २३- २३, १ चौकार, १ षटकार, जिमी नीशम नाबाद २६- १३ चेंडू, २ षटकार, मिशेल स्टार्क ४-०-३६-०, जोश हेझलवूड ४-०-४१-२, पॅट कमिंस ४-०-४६-०, अॅडम झॅम्पा ४-०-३९-१) वि.

ऑस्ट्रेलिया : १७.१ षटकांत सर्व बाद १११ (डेव्हिड वॉर्नर ५, अॅरॉन फिन्च १३, मिशेल मार्श १६- १२ चेंडू, २ चौकार, १ षटकार, ग्लेन मॅक्सवेल २८- २० चेंडू, ३ चौकार, १ षटकार, पॅट कमिंस २१- १८ चेंडू, २ चौकार, १ षटकार, ट्रेंट बोल्ट ४-०-२४-२, टीम साऊदी २.१-०-६-३, मिशेल सँतनर ४-०-३१-३, लॉकी फॉर्ग्युसन ३-०-२०-१)

फिलिप्सचा अफलातून झेल

न्यूझीलंडची गोलंदाजीही आज अव्वल दर्जाची होती असे नाही, तर क्षेत्ररक्षणही कमालीचे उच्च कोटीचे होते. मार्कस स्टॉयनिसचा सीमारेषेजवळचा झेल, ग्लेन फिलिप्सने उजव्या बाजूला धावत हवेत किमान चार फूट जमिनीशी समांतर असताना पकडलेला झेल नजरेचे पारणे फेडणारा ठरला. निम्मा संघ ६८ धावांत गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चितच होता, औपचारिकता केवळ तीन अंकी धावांची होती. शेवटी त्यांना पूर्ण २० षटके फलंदाजी करता आली नाही.

बोल्ट-साऊदीकडून भन्नाट मारा

ऑस्ट्रेलियासाठी हे आव्हान कठीण नव्हतेच, पण ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी ही जोडी वातावरण सहायक असेल तर फारच धोकादायक ठरते. त्यास आजचा दिवस अपवाद नव्हता. पहिल्या सहा षटकांत ऑस्ट्रेलियाचे चार मोहरे गारद केल्यानंतर गतविजेत्यांच्या आक्रमणातील धार बोथट झाली. यात फिरकी गोलंदाज सँतनरनेही आपली चमक दाखवली.

दृष्टिक्षेपात

फेब्रुवारी २००९ नंतर न्यूझीलंडने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियात मिळवलेला पहिला विजय

घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाची टी-२० क्रिकेटमध्ये सर्वांत निचांकी धावसंख्या याअगोदर पाकिस्तानविरुद्ध २०१० मेलबर्नमध्ये त्यांना १२७ धावा करता आल्या होत्या.

आयसीसीशी पूर्ण सदस्य असलेल्या देशांमध्ये (टी-२० वर्ल्डकप) सर्वांत मोठा विजय

९० धावांनी भारताचा इंग्लंडवर विजय (कोलंबो २०१२)

८९ धावांनी न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर विजय (सिडनी २०२२)

८४ धावांनी वेस्ट इंडीजचा पाकवर विजय (मिरपूर २०१४)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT