Tim Southee File Photo
क्रीडा

कॅन्सरग्रस्त मुलीसाठी साउदीनं विकायला काढली मोलाची वस्तू

साउदीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन यासंदर्भातील माहिती दिलीये.

सुशांत जाधव

न्यूझीलंड संघाचा जलदगती गोलंदाज टिम साउदीने दुर्मिळ कॅन्सर पीडित आठ वर्षांच्या मुलीसाठी मोठे पाउल उचलले आहे. या मुलीवर उपचारासाठी आर्थिक मदत उभारण्यासाठी टिम साउदीने WTC Final च्या ऐतिहासिक सामन्यातील आपली जर्सी लिलावात काढलीये. वर्ल्ड टेस्ट फायनलमध्ये टिम साउदीने घातलेल्या जर्सीवर टेस्ट चॅम्पियन ठरलेल्या संघातील सर्व खेळाडूंचे हस्ताक्षर आहे. (New Zealand Cricketer Tim Southee Auction His WTC-Final Jersey To Raise Funds For A Girl Suffering From Cancer)

साउदीने मोलाची असलेल्या जर्सीचा लिलाव करुन कॅन्सरशी झुंज देणाऱ्या होली बीटी नावाच्या 8 वर्षांच्या मुलीला अर्थिक मदत करण्याचे ठरवले आहे. बीटी 2018 पासून कर्करोगातील दुर्मिळ प्रकार असलेल्या न्यूरोब्लास्टोमा आजाराने त्रस्त आहे. दोन वर्षांपूर्वी टिम साउदीला तिच्या अजारासंदर्भात कळले.

साउदीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन यासंदर्भातील माहिती दिलीये. 32 वर्षीय साउदीनं आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलंय की, होली बीटीवरील उपचारासाठी आर्थिक मदत गोळा करण्याच्या उद्देशाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील माझी जर्सी लिलावास काढली आहे. यातून मिळणारी सर्व रक्कम बीटीच्या कुटुंबियांनी दिली जाईल. माझ्या कुटुंबियांना दोन वर्षांपूर्वी क्रिकेट कम्युनिटीच्या माध्यमातून हॉलीच्या आजारपणाविषयी कळले. त्याच वेळी तिच्या कुटुंबियांतील सकारात्मकता आणि दृढ निश्चयाची भावना ऐकून भारावून गेलो. तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे समजल्यापासून यासाठी प्रयत्नशील आहे. या जर्सीच्या लिलावातून बीटीला कोही प्रमाणात मदत होईल. या जर्सील छोटी-मोठी कितीही बोली लागली तरी ती बीटीच्या उपचारासाठी उपयुक्त ठरेल.

टीम इंडिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टिम साउदीने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने 4 विकेटसह 30 धावांचे योगदान दिले होते. न्यूझीलंडच्या संघाने हा सामना 8 विकेट्सनी जिंकून नवा इतिहास रचला होता. ऐतिहासिक विजयातील जर्सीचं मोल खेळाडूसाठी खूप मोठे असते. पण साउदीनं मनाचा मोठेपणा दाखवून मोलाची जर्सी लिलावात काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाचे सोशल मीडियावरही कौतुक होताना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT