New Zealand Defeat Sri Lanka  esakal
क्रीडा

NZ vs SL : आशियाई शेर न्यूझीलंडपुढे ढेर! ग्रुप 1 मध्ये किवी अव्वल तर लंका पाचव्या स्थानावर

अनिरुद्ध संकपाळ

New Zealand Defeat Sri Lanka : टी 20 वर्ल्डकप 2022 च्या ग्रुप 1 मधील सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 65 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडने सुपर 12 फेरीच्या ग्रुप 1 मध्ये 5 गुणांसह आपले अव्वल स्थान अजून बळकट केले. तर श्रीलंका तीन सामन्यानंतर ग्रुपच्या तळातून दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. श्रीलंका तीन सामन्यातील एक सामना जिंकून 2 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने झुंजार 104 धावांची शतकी खेळी करत संघाला 167 धावांपर्यंत पोहचवले. श्रीलंकेला हे विजयासाठीचे 168 धावांचे आव्हान पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 102 धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 4 तर मिचेल सँटनरने 2 बळी टिपले. लंकेकडून दसुन शनका (35) आणि भानुका राजपक्षा (34) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.

न्यूझीलंडने ठेवलेल्या 168 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीने 4 बाद 8 धावा अशी केली. साऊदीने निसंकाची मेंडीस, डिसिल्वा आणि असलंकाची तर बोल्टने लंका आज मोठ्या धावफरकाने हरणार असे वाटत असतानाच भानुका राजपक्षे आणि कर्णधार दसुन शनका यांनी झुंजार खेळी करत संघाला शतकी मजल मरण्यास मदत केली. यामुळे आशिया कप विजेत्या श्रीलंकेवरील मोठ्या पराभवाची नामुष्की टळली. श्रीलंकेने 19.2 षटकात सर्वबाद 102 धावा केल्या. न्यूझीलंडने सामना 65 धावांनी जिंकला.

टी 20 वर्ल्डकप 2022 मधील ग्रुप 1 च्या न्यूझीलंड विरूद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यात किवींनी प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 167 धावा केल्या. खराब सुरूवातीनंतर ग्लेन फिलिप्सने झुंजार शतकी (64 चेंडूत 104) खेळी केली. न्यूझीलंडचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना एकट्या ग्लेन फिलिप्सने धडाकेबाज फलंदाजी करत न्यूझीलंडला 150 चा टप्पा पार करून दिला. त्याला डॅरेल मिचेलने 22 तर सँटनरने 11 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. श्रीलंकेकडून कुसल रजिथाने 2 तर हसरंगा, तिक्षाणा, डिसिल्वा आणि लाहिरू कुमाराने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT