Simon Doull Lambasts  ESAKAL
क्रीडा

IND vs NZ : दिग्गज क्रिकेटपटूने केल्या स्टेडियमवरील खुर्च्या साफ; न्यूझीलंडची नाचक्की

अनिरुद्ध संकपाळ

Simon Doull Lambasts : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द झाला. सामन्याच्या नाणेफेकीपूर्वीच वेलिंग्टनमध्ये तुफान पाऊस फडल्यामुळे सामना रद्द करावा लागला. मात्र या सामन्यादरम्यान कॉमेंटरी बॉक्समधून जे फोटो समोर आले आणि क्रिकेट जगतात त्याची तुफान चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंमुळे न्यूझीलंड क्रिकेटची नाचक्की झाली. हे फोटो न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सायमन डूल यांनी शेअर केले आहेत.

सायमन डूल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर करत लिहिले की, 'स्काय स्टेडियमवर खेळण्याचे अजून एक महान कारण. आताच मी कॉमेंट्री बॉक्समधील सर्व खुर्च्या साफ केल्या जेणेकरून आपले विदेशी सहकारी इथे बसू शकेल. खूप वाईट जागा आहे. नाचक्ती करणारी घटना.' पहिल्या सामन्यादरम्यान कॉमेंट्री बॉक्समधील खुर्च्यांची अवस्था खूप खराब होती. ते पाहून सायमन यांना रहावलं नाही त्यांनी स्वतःच खुर्च्या साफ केल्या.

सायमन यांनी दुसरे ट्विट करून याचा बाहेरच्या खुर्च्यांशी काही संबंध नाही. माझ्या मते एका आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना असताना सगळी तयारी झालेली असावी. मात्र तुम्हाला असं वाटत नसेल तर काही हरकत नाही. आपल्यामध्ये मतभेद असू शकतात जे ठीक आहे. यानंतर चाहत्यांनी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डावर टीका करण्यास सुरूवात केली.

न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील दुसरा टी 20 सामना रविवारी माऊंट माँगानुई येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ टी 20 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये जाऊन हरल्या आहेत. त्यानंतर आता दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. भारतीय संघात अनेक बदल झाले आहेत. हार्दिक पांड्या या दौऱ्यासाठी टी 20 संघाचे नेतृत्व करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT