New Zealand squad for ODI World Cup 2023 
क्रीडा

World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी आणखी एका संघाची घोषणा, जखमी खेळाडू असेल कर्णधार

Kiran Mahanavar

New Zealand squad for ODI World Cup 2023 : भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न्यूझीलंडनेही 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. दुखापतग्रस्त केन विल्यमसनचा संघात समावेश करण्यात आला असून तो वर्ल्ड कप मध्ये किवी संघाचे नेतृत्व करणार आहे. आयपीएल 2023 मध्ये झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीतून तो अजूनही सावरले नाही. केन विल्यमसन किती दिवसात तंदुरुस्त होईल हे स्पष्ट नाही.

2019 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा अष्टपैलू जिमी नीशम यालाही न्यूझीलंडच्या 15 सदस्यीय विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात नीशमने सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी केली. मात्र, सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली आणि चौकार मोजण्याच्या नियमामुळे इंग्लंड प्रथमच विश्वविजेता ठरला.

नीशम व्यतिरिक्त ट्रेंट बोल्ट देखील 2019 वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळला होता आणि केंद्रीय करार यादीत नसतानाही, या दोघांनाही न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले आहे. विल्यमसन आणि वेगवान गोलंदाज टीम साऊदी यांचा हा चौथा वर्ल्ड कप आहे. त्याचवेळी रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स आणि विल यंग हे प्रथमच एकदिवसीय वर्ल्ड कप खेळणार आहेत. त्याचवेळी, बोल्ट, मॅट हेन्री आणि उपकर्णधार टॉम लॅथम यांचा हा तिसरा वर्ल्ड कप आहे.

न्यूझीलंडचा 15 जणांचा संघ : केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, इशसो , टिम साउथी आणि विल यंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'कॉकरोच जनता पार्टी'ची पाकिस्तानात क्रेझ! पाकमध्येही 'कॉकरोच पार्टी', देशाच्या गृहमंत्र्यानेच सरकारला दिला 'हा' इशारा

Deglur Accident: देगलूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; आयशरच्या धडकेत तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

Pune Drugs Crackdown: पुणे पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! 162 गुन्हे, 283 आरोपी अटकेत; 11.28 कोटींचा मुद्देमाल जप्त

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

SCROLL FOR NEXT