kane williamson and daryl mitchell sakal
क्रीडा

New Zealand Vs Bangladesh : न्यूझीलंडचा सलग तिसरा विजय

केन विल्यमसनचे अर्धशतकी पुनरागमन; बांगलादेशवर मात

सकाळ वृत्तसेवा

New Zealand Vs Bangladesh World Cup 2023 : चेन्नई - न्यूझीलंड क्रिकेट संघाचा एकदिवसीय क्रिकेट विश्‍वकरंडकातील झंझावात शुक्रवारीही कायम राहिला. केन विल्यमसनच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या न्यूझीलंडने बांगलादेशचा ८ विकेट व ४३ चेंडू राखून धुव्वा उडवला.

ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन व मिचेल सँटनर यांची प्रभावी गोलंदाजी व केन विल्यमसन, डेव्होन कॉनवे व डॅरेल मिचेल यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने विश्‍वकरंडकातील सलग तिसरा विजय मिळवला. या विजयासह त्यांचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशला यंदाच्या स्पर्धेत दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

बांगलादेशकडून न्यूझीलंडसमोर २४६ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. पहिल्या दोन लढतींत दमदार कामगिरी करणारा राचिन रवींद्र या लढतीत ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर डेव्होन कॉनवे व केन विल्यमसन या जोडीने ८० धावांची भागीदारी केली. कॉनवे अर्धशतक झळकावणार असे वाटत असतानाच शाकीब अल हसनच्या गोलंदाजीवर तो पायचीत बाद झाला.

विल्यमसन व डॅरेच मिचेल या जोडीने १०८ धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडसाठी मोलाची कामगिरी बजावली. आयपीएलनंतर क्रिकेटच्या मैदानात उतरणारा विल्यमसन शतकी खेळी करील अशी चिन्ह निर्माण झाली होती. पण धाव घेत असताना क्षेत्ररक्षकाकडून टाकण्यात आलेला चेंडू विल्यमसनच्या हाताला लागला आणि त्याला दुखापतीने निवृत्त व्हावे लागले.

त्याने १०७ चेंडूंमध्ये ८ चौकार व १ षटकारासह ७८ धावांची खेळी केली. त्यानंतर मिचेलने नाबाद ८९ धावांची आणि ग्लेन फिलिप्सने नाबाद १६ धावांची खेळी करीत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

बांगलादेशला रोखले

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यात प्रभावी गोलंदाजी केली. मुशफिकुर रहीम याने ६६ धावांची, महमुद्दूलाहने नाबाद ४१ धावांची आणि शाकीब अल हसनने ३० धावांची खेळी केली. लॉकी फर्ग्युसनने निर्णायक क्षणी ४९ धावा देत तीन मोहरे बाद केले.

ट्रेंट बोल्ट व मॅट हेन्‍री यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. मिचेल सँटनर याने १० षटकांत ३१ धावा देत एक फलंदाज बाद केला. बांगलादेशला ९ बाद २४५ धावांपर्यंत मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक -

बांगलादेश ५० षटकांत ९ बाद २४५ धावा (मेहदी हसन मिराज ३०, शाकीब अल हसन ४०, मुशफिकुर रहीम ६६, महमुद्दूलाह नाबाद ४१, लॉकी फर्ग्युसन ३/४९, ट्रेंट बोल्ट २/४५, मॅट हेन्‍री २/५८) पराभूत वि. न्यूझीलंड ४२.५ षटकांत २ बाद २४८ धावा (डेव्होन कॉनवे ४५, केन विल्यमसन दुखापतीने निवृत्त ७८, डॅरेल मिचेल नाबाद ८९, ग्लेन फिलीप्स नाबाद १६).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान पंचवीस दिवसांपासून रस्त्यावरच

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT