New Zealand Without Kane Williamson Tim Southee For India White-Ball Tour ind vs nz odi cricket news kgm00 sakal
क्रीडा

IND vs NZ ODI: न्यूझीलंड क्रिकेटला नवा चेहरा! विल्यमसन, साऊदीविना किवी संघ भारतात

केन विल्यमसन व टीम साऊदी हे दोन प्रमुख खेळाडू फक्त...

सकाळ ऑनलाईन टीम

India vs New Zealand ODI 2022 : न्यूझीलंड क्रिकेट मंडळाकडून सोमवारी पाकिस्तान व भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा करण्यात आली. केन विल्यमसन व टीम साऊदी हे दोन प्रमुख खेळाडू फक्त पाकिस्तानविरुद्ध मालिकेत खेळणार आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांना विश्रांती देण्यात आली आहे.

विल्यमसन व साऊदी पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडसाठी खेळणार आहेत; मात्र भारताविरुद्धच्या मालिकेमधून त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यातील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळता यावे, यासाठी दोघांची भारताविरुद्धच्या मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाही. टॉम लॅथम याच्याकडे न्यूझीलंड संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे.

शिपले नवा चेहरा

न्यूझीलंडच्या संघात एका नव्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. त्याचे नाव हेन्‍री शिपले हे आहे. तो २६ वर्षांचा असून अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. हेन्‍री न्यूझीलंडमधील कँटरबरी संघामधून खेळत असून त्याने पहिला प्रथमश्रेणी सामना २०१६ मध्ये खेळला.

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ : फिन ॲलेन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्होन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्‍री, टॉम लॅथम (कर्णधार), ॲडम मिल्न, डॅरेल मिचेल, हेन्‍री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, हेन्‍री शिपले, इश सोधी.

भारत-न्यूझीलंड, एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली लढत १८ जानेवारी, हैदराबाद

  • दुसरी लढत २१ जानेवारी, रायपूर

  • तिसरी लढत २४ जानेवारी, इंदोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT