Neymar Al-Hilal  esakal
क्रीडा

Neymar Al-Hilal : काय त्या गाड्या.. काय तो राजवाडा.. नेमारवर अल - हिलालनं केला मोठा खर्च

अनिरुद्ध संकपाळ

Neymar Al-Hilal Football : द सनमधील वृत्तानुसार ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने अल - हिलाल या सौदी फुटबॉल क्लबला चांगलंच खर्चात पाडलं आहे. त्याने आपल्या स्वत:साठी तीन आलिशान गाड्यांची मागणी केली आहे. याचबरोबर सोबतच्या व्यक्तींसाठी चार मर्सिडीस जी वॅगन आणि चालकासह मर्सिडीस व्हॅनची देखील मागणी केली आहे.

नेमारने अल - हिलाल क्लबच्या व्यवस्थापनाकडे त्याच्यासाठी आणि त्याचा मित्रपरिवार, कुटुंबासाठी 24 तास ड्रायव्हर देण्याची मागणी देखील केली आहे. नेमारने क्लबकडे बेंट्ली कॉन्टिनेट्ल जीपी, एस्टोन मार्टिन डीबीएक्स आणि लॅम्बॉर्गिनी हरिकेन या कांड्याची मागणी केल्याचे समजते आहे.

याचबरोबर त्याच्या घरातील फ्रिजमध्ये असाई ज्यूस आणि गुराना ड्रिंक्स कायम असला पाहिजे अशीही मागणी केली आहे. (Neymar Luxury Cars Collection)

द मिररने दिलेल्या वृत्तानुसार नेमारला देण्यात आलेल्या सौदी अरेबियामधील प्रॉपर्टीमध्ये 25 खोल्या स्विमिंग पूल आहे. अल - हिलालकडून नेमारला वर्षाला 173.8 मिलियन युरो मिळण्याची शक्यता आहे. नेमारने अल - हिलालशी करार केल्यानंतर तो सौदी प्रो लीगमधील तिसरा सर्वात मोठ्या रक्कमेचा फुटबॉलपटू ठरला. यापूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि करीम बेंझेमा यांना देखील सौदी लीगमध्ये खेळण्यासाठी भलीमोठी रक्कम देण्यात आली आहे.

नेमार या करारानंतर बोलता म्हणाला की, 'दुसऱ्या संघातील उत्तम दर्जाच्या खेळाडूंविरूद्ध दोन हात करायला मिळणे हे खूप उत्सहवर्धक आहे. यामुळे मला देखील चांगलं खेळण्याची प्रेरणा मिळते. ज्यावेळी तुम्ही रोनाल्डो, बेंजेमा रिबेर्टोच्याविरूद्ध खेळणार असता त्यावेळी उत्साह वेगळाच असतो.'

'मला वाटते की संघातील गुणवत्ता देखील फार महत्वाची असते. काही निर्णय हे तुमच्या संपूर्ण कारकिर्दीला मदत करतात. हा निर्णय देखील माझ्यासाठी तसाच आहे. मी या क्लब आणि संघासोबत एक जबरदस्त स्टोरी लिहिण्यासाठी उत्सुक आहे. जास्तीजास्त विजेतेपदं जिंकून क्लबचे ध्येय पूर्ण करायचं आहे.'

नेमार 2017 मध्ये बार्सिलोना सोडून पीएसजीमध्ये दाखल झाला होता. यावेळी तो जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू ठरला होता. त्याने पीएसजीकडून 173 सामने खेळले. त्यात त्याने 118 गोल केले. पीएसजीकडून 6 हंगाम खेळल्यानंतर आता त्याने सौदीकडून आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT