Neymar's girlfriend And Newborn Child Kidnaping esakal
क्रीडा

Neymar girlfriend Kidnaping : नेमारची गर्लफ्रेंड ब्रुना अन् मुलीच्या किडनॅपिंगचा प्रयत्न?

अनिरुद्ध संकपाळ

Neymars girlfriend And Newborn Child Kidnaping : ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारची गर्लफ्रेंड ब्रुना बियानकार्डी आणि तिचे नवजात बालक यांच्या किनॅपिंगचा प्रयत्न झाला असा दावा खुद्द ब्रुनाने केला आहे. ब्रुनाने दावा केल्याप्रमाणे तिला आणि तिच्या बाळाला एका गुन्हेगारी टोळीने टार्गेट केलं. त्यांनी मंगळवारी ब्राझीलमधील अपार्टमेंटमध्ये बळजबरी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी ब्रुना आणि तिची मुलगी दोघेही घरात नव्हते.

आर 7 या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ब्रुनाच्या कुटुंबीय हे घटना घडली त्यावेळी घरी होते. या दोघांना या टोळीने ओलीस ठेवलं होतं. मात्र नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. दरम्यान नेमारची (Neymar) गर्लफ्रेंड ब्रुनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे या वृत्ता दुजोरा दिला.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या ब्रुनाने इन्स्टाग्रावर स्टोरी ठेवली. या स्टोरीत ती म्हणते की, 'आज भल्या पहाटे माझ्या घरात दरोडा टाकण्यात आला. माझ्या आई - वडिलांना ओलीस ठेवण्यात आलं. मी, माझी मुलगी माव्ही आणि माझी बहीण घरी नव्हतो. आम्ही तेथे राहत नाही.

bruna biancardi

ब्रुना पुढे म्हणाली की, 'देवाच्या कृपेने माझे आई - वडील सुरक्षित आहेत. त्यांना काही झालेलं नाही. आम्ही यातून पुन्हा सावरू. मला सर्वांना सांगायचं आहे की जे कोणी हे कृत्य केलं ते सापडले आहेत.' पोलिसांनी या प्रकरणात एका 20 वर्षाच्या मुलाला अटक केली आहे. तसेच या दरोड्यात सामील असलेल्या इतर दोघांचा शोध घेत आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT