nikhat zareen 
क्रीडा

CWG 2022: बॉक्सर निखत जरीनकडून भारताला सुवर्ण पदकाची आशा

निखत, लोवलीना उपांत्यपूर्व फेरीत, पराभवानंतर शिव थापा स्पर्धेबाहेर

Kiran Mahanavar

Nikhat Zareen Commonweatlh Games : जागतिक चॅम्पियन निखत जरीन व टोकियो ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या लोवलीना बागेहिन यांनी आपापल्या सामन्यांत विजय मिळवून येथे चालू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील बॉक्सिंग यातील महिला गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. निखतने ५० किलो वजनी गटाच्या सामन्यात मोझांबिकच्या हेलेना इस्माईल बागाओला पराभूत केले; तर लोवलीनाने ७० किलो वजनी गटाच्या लढतीत एरियाना निकोल्सचा ५-० असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

भारताच्या शिवा थापाला मात्र ६३.५ किलो वजनी गटाच्या अंतिम १६ फेरीच्या सामन्यात स्कॉटलंडच्या रीस लिंचकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तसेच ९२ किलोंच्या हेवीवेट गटात बॉक्सर संजीतचेही सोमोआच्या आटो लिओ प्लॉडझिकीकडून पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

निर्धार सुवर्णपदकाचा

झरीनला उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टनचे आव्हान असेल. "मी पुढील फेरीत आणखी चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे. आता पदकापासून फक्त एक लढत दूर आहे, पण मी येथे सुवर्ण जिंकण्याचा निर्धार करून आलेले आहे," असे निखतने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT