World Boxing Championship  
क्रीडा

World Boxing Championship : भारताचा 'गोल्ड'न चौकार; लवलीनाही बनली वर्ल्ड चॅम्पियन

निखत पाठोपाठ लवलिनाही जिंकली 'गोल्ड'!

Kiran Mahanavar

World Boxing Championship : भारताची दिग्गज बॉक्सर लवलीना बोरगोहेनने महिलांच्या जागतिक स्पर्धेत इतिहास रचला. त्याने 70-75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. ती पहिल्यांदाच जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. लवलीना बोरगोहेनने ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करचा 4-3 असा पराभव केला. तिने याआधी 2018 आणि 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

या जागतिक स्पर्धेतील भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे. तिच्या आधी निखत जरीन, नीतू, स्वीटी बुरा यांनी भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. नीतू आणि स्वीटीने शनिवारी पदक जिंकले, तर निकतने रविवारी सुवर्णपदक पटकावले.

हा सामना चुरशीचा होता. पहिली फेरी लवलीनाने जिंकली होती, मात्र दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियन खेळाडूने दमदार पुनरागमन करत ही फेरी जिंकली. तिसऱ्या फेरीत दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत झाली. फेरीच्या शेवटी लवलीनाने काही चांगले पंच केले आणि यामुळे सामना रिव्ह्यूवर गेला जिथे लवलीना जिंकली.

गेल्या वर्षी कॉमनवेल्थ गेम्समध्ये लवलीना बोरगोहेन 66-70 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली होती. तिला वेल्सच्या रोझी एक्लेसने 3-2 ने पराभूत केले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या लोव्हलिना 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही पदक जिंकू शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ''रस्त्यावरील सर्व श्वान हटवण्याचे आदेश दिलेले नाहीत'', सुप्रीम कोर्टाने दिलं स्पष्टीकरण

Ahilyanagar News : "पुस्तक, निसर्ग आणि माणूस वाचणे आयुष्यभर आवश्यक"– युवा साहित्य संमेलनात मनोज बोरगावकरांचे विचारमंथन!

Viral News : चोरांवर भारी पडली मुंबईची नारी ! पोलिसांनी हात झटकले पण अंकिताने वाराणसीत शोधला चोरी गेलेला फोन, सोशल मीडियावर होतेय कौतुक

Nashik Municipal Election : पॅनलमध्येच दगाफटका? नाशिक मनपा निवडणुकीत उमेदवारांना आता 'क्रॉस वोटिंग'चे टेन्शन

EPFO कडून ट्रान्सजेंडर समुदायाला ऐतिहासिक दिलासा! नाव-लिंग बदल आता अडथळ्याविना होणार, नवे नियम लागू

SCROLL FOR NEXT