NIT Srinagar Issue Notice To Student Not Watch India vs Pakistan Asia Cup 2022 Match In Group
NIT Srinagar Issue Notice To Student Not Watch India vs Pakistan Asia Cup 2022 Match In Group  ESAKAL
क्रीडा

IND vs PAK : भारताच्या NIT श्रीनगरमध्ये भारत-पाकिस्तान सामना समुहाने पाहण्यास बंदी

अनिरुद्ध संकपाळ

श्रीनगर : राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान (NIT) श्रीनगरने आपल्या विद्यार्थ्यांना आशिया कपमधील भारत - पाकिस्तान सामना समूह करून न पाहण्यास सांगितले आहे. याचबरोबर श्रीनगर NIT ने आपल्या विद्यार्थ्यांना या सामन्यासंदर्भात कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यास देखील मनाई केली आहे. संस्थेचे डीन ऑफ स्टुडंट वेलफेअर यांच्यामार्फत ही नोटीस बजावण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना सामन्यादरम्यान आपल्या हॉस्टेलच्या रूममध्येच थांबण्याची ताकीद देण्यात आली आहे. (NIT Srinagar Issue Notice To Student Not Watch India vs Pakistan Asia Cup 2022 Match In Group)

NIT श्रीनगरच्या नोटिशीमध्ये 'विद्यार्थ्यांना माहिती आहे की दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेगवेगळ्या देशांचा क्रिके सामना होणार आहे. विद्यार्थ्यांना निर्देश देण्यात येतात की खेळाला खेळासारखे पहा आणि सस्थान आणि हॉस्टेलमध्ये कोणताही गोंधळ घालायचा नाही.' अशी ताकिद देण्यात आली.

भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यान विद्यार्थ्यांना आपापल्या रूममध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे. जर विद्यार्थ्यांनी उतरांच्या रूममध्ये प्रवेश केला किंवा सामुहिकरित्या सामना पाहण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. प्रशासनाने 'जर कोणत्या रूममध्ये विद्यार्थ्यांचा समूह आढळून आला तर ज्याची रूम आहे त्याला संस्थेच्या हॉस्टेलमधून काढून टाकण्यात येईल. तसेच इतर विद्यार्थ्यांना 5 हजार रूपयांचा दंड आकारण्यात येईल.' असे सांगितले.

2016 च्या वर्ल्डकप सामन्यावेळी झाला होता वाद

प्रशासनाने या सामन्याबाबत सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करण्यास मनाई केली आहे. 2016 च्या टी 20 वर्ल्डकप दरम्यान सेमी फायनलमध्ये भारत वेस्ट इंडीजकडून पराभूत झाला होता. त्यावेळी दुसऱ्या राज्यातील आणि स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यामुळे काही दिवस श्रीनगर NIT बंद होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT