Paris Olympic 2024  Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतील खेळाडूंना नसणार वयाला बंधन; ११ वर्षीय मुलगी ते ६१ वर्षीय वयस्क हाेणार सहभागी

Paris Olympic latets news in marathi | ११ वर्षे ११ महिने वय असलेली चीनची स्केटबोर्डर खेळाडू झेंग होहाओ या पॅरिस ऑलिंपिकमध्ये आपले पदार्पण करणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : गुणवत्ता, क्षमता आणि जिद्द असली की खेळाडूंना वयाचे बंधन नसते. यंदाची पॅरिस ऑलिंपिकही त्यास अपवाद नसेल. कारण ११ वर्षीय मुलगी ते ६० वर्षीय वयस्क या ऑलिंपिक क्रीडा महोत्सवात स्पर्धा करणार आहेत.

११ वर्षे ११ महिने वय असलेली चीनची स्केटबोर्डर खेळाडू झेंग होहाओ या पॅरिस ऑलिंपिकमध्ये आपले पदार्पण करणार आहे. यंदाच्या स्पर्धेतील ती सर्वात लहान खेळाडू असणार आहे. आतापर्यंत सर्वात लहान खेळाडू ऑलिंपिकमध्ये खेळण्याचा विक्रम ग्रीक जिम्नॅस्ट दिमित्रिओस लाउंड्रास हिच्या नावावर होता.

१९८६ च्या स्पर्धेत तिचे वय १० वर्षे २१८ दिवस असे होते. झेंग ११ ऑगस्ट रोजी १२ वर्षांची होणार आहे. २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिंपिकच्या वेळी होहाओ सात वर्षांची होती आणि हौसमधून ती स्केटबोर्डर खेळू लागली.

टोकियो ऑलिंपिकसाठी झालेल्या चाचणी स्पर्धेत मी वयाने मोठ्या असलेल्या खेळाडूंना खेळताना पाहिले होते आणि आपणही हा खेळ खेळावा असे मला वाटले, असे होहाओ म्हणाली. झेंग होहाओ हीच केवळ बालकवयीन खेळाडू या ऑलिंपिकमध्ये असणार असे नाही. कॅनेडियन स्केटबोर्डर फे डे फॅजिओ एबर्ट १४ वर्षीय, तर अमेरिकेच्या क्विन्सी विल्सन आणि हेझली रिवेरा, ग्रेट ब्रिटनची लोला टेम्बलिंग आणि स्काय ब्राउन या १६ वर्षीय खेळाडू असतील.

७२ वर्षांतही ऑलिंपिक

सर्वाधिक वयस्क खेळाडू होण्याचा मान स्वीडनचे नेमबाज ऑस्कर स्वाहन यांच्या नावावर आहे. १९२० मधील अँटवर्प ऑलिंपिकमध्ये ते ७२ वर्षांचे होते.

भारताकडून धिनिधी सर्वांत लहान

भारताकडून जलतरणपटू धिनिधी देसिंघू ही सर्वात लहान खेळाडू असणार आहे. ती १४ वर्षांची आहे. या ऑलिंपिकमध्ये ती २०० मीटर फ्रिस्टाईलमध्ये सहभागी होणार आहे. ऑलिंपिक कोट्यातून ती पात्र ठरली आहे.

जिल इरविंग सर्वात वयस्क

कॅनडाची अश्वारोहक जिल इरविंग ही या ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारी सर्वात वयस्व खेळाडू असणार आहे. ६१ व्या वर्षी ती या पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदार्पण करणार आहे. झेंग होहाओपेक्षा तिचे वय पाच पटीने अधिक आहे. मात्र ६९ वर्षीय ऑस्ट्रेलियाची मेरी हाना जिल इरविंग हिला मागे टाकू शकतात. १९९६ च्या ॲटलांटा स्पर्धेपासून ती अश्वरोहणात सहभागी होत आहेत. आताही त्यांचा संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश आहे. ऑस्ट्रेलिया संघातील एखादा खेळाडू जखमी झाला किंवा आजारी पडला तरच मेरी हाना खेळू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT