no deadline but at the moment i am saina nehwal opens up on retirement sports sakal
क्रीडा

Saina Nehwal : ऑलिंपिक पात्रता आव्हानात्मक; एवढ्यात निवृत्तीचा विचार नाहीच!

साईना नेहवाल : तंदुरुस्त झाल्यानंतरच पॅरिसमधील क्रीडा महोत्सवात सहभागी होणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये दुखापत व सुमार फॉर्म यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पीछेहाट झालेल्या साईना नेहवाल हिने मात्र बॅडमिंटन या खेळाला अलविदा करण्याचा निर्णय घेतलेला नाही. २०२४ मधील पॅरिस ऑलिंपिकच्या पात्रता फेरीमध्ये यश मिळवणे आव्हानात्मक असले, तरी प्रयत्न करणार आहे. तसेच निवृत्तीचा विचार सध्या तरी मनामध्ये सुरू नाही, असे तिने याप्रसंगी स्पष्ट केले.

गुरुग्राम येथे २४ सप्टेंबर रोजी हार्वेस्ट गोल्ड ग्लोबल शर्यत होणार आहे. या शर्यतीची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून साईना नेहवालची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी साईना पुढे म्हणाली, एक ते दीड तास सराव केल्यानंतर गुडघा दुखायला लागतो. त्यानंतर गुडघा वाकतही नाही. यामुळे दुसऱ्या सराव सत्रामध्ये सहभागी होता येत नाही.

डॉक्टरकडून इंजेक्शन देण्यात येत आहेत. फिजियोकडूनही मदत होत आहे; पण दुखणे व सूज जास्त प्रमाणात कमी झालेली नाही. यामधून पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी अवधी जाणार आहे. मला माहीत आहे की, ऑलिंपिक जवळ आले आहे; पण तोपर्यंत तंदुरुस्त होणे आव्हानात्मक असणार आहे. तंदुरुस्त नसतानाही स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यास मनाजोगता निकाल मिळत नाही, असे साईनाने स्पष्ट केले.

अव्वल दर्जाच्या खेळाडूंना सामोरे जाण्याआधी फक्त एका तासाचा सराव करून चालणार नाही. ॲन सीयंग, ताई यिंग व अकाने यामागुची यांसारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना हरवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून खेळ करावा लागतो, असे साईना आवर्जून सांगते.

सिंधूचे मनोधैर्य वाढवले

साईना नेहवालप्रणाणे भारताची दिग्गज खेळाडू पी. व्ही. सिंधू हिला दुखापतीमधून बाहेर येत प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यावर साईना म्हणाली, सिंधू हिने गेल्या आठवड्यात प्रकाश पडुकोन बॅडमिंटन अकादमीत सराव केला. विविध प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळल्यास खेळामध्ये सुधारणा होऊ शकते.

एकाच प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळताना आमूलाग्र बदल होत नाही. मी प्रशिक्षक बदलला आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली. जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला. त्यामुळे सिंधूचा निर्णय योग्य आहे, असा विश्‍वास साईनाकडून व्यक्त करण्यात आला.

प्रत्येक खेळाडूला निवृत्त व्हावे लागतेच. जेव्हा आपले शरीर साथ देत नाही, तेव्हा निवृत्तीचा निर्णय घेतला जातो. यासाठी मर्यादा नसते. पुनरागमनासाठी प्रयत्न करीत आहे. देशासाठी प्रदीर्घ काळ खेळल्यानंतर अजूनही बॅडमिंटन खेळण्याची इच्छा आहे.

ऑलिंपिक व आशियाई या दोन्ही स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी माझ्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धांमध्ये खेळण्याची तीव्र इच्छा नाही. पण संधी मिळाल्यास विक्रमांसह पदकांवर मोहोर उमटवण्यासाठी जीवाचे रान करीन.

- साईना नेहवाल, बॅडमिंटनपटू, भारत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

Anmol Bishnoi: अखेर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला भारतात आणलं; NIA कडून अटक, कसा बनला भारतातील 'मोस्ट वॉन्टेड'?

Mumbai Crime: पाणी भरण्यावरून वाद; महिलेचं डोकं फिरलं; घरातून मॉस्किटो किलर स्प्रे आणलं अन्...; व्यक्तीसोबत नको ते घडलं

LinkedIn Workforce Survey: एआयमुळे बदलतंय मुंबईचं बिझनेस लँडस्केप, लिंक्डइनच्या सर्व्हेत समोर आले धक्कादायक आकडे

SCROLL FOR NEXT