क्रीडा

ईशान आणि श्रेयसवर शिस्तभंगाची कारवाई नाही ; मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे स्पष्टीकरण

द्रविड यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेतून या दोघांवर अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

मोहाली : ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना शिस्तभंगाच्या कारवाईमुळे भारतीय संघातून वगळण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले.

अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश करण्यात आलेला नाही. शिस्तभंगाच्या कारवाईमुळे निवड समितीने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे; परंतु द्रविड यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेतून या दोघांवर अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगितले.

ईशान किशनने तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून आपल्याला विश्रांतीची गरज असल्याचे बीसीसीआयला कळवले होते. त्याच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. आपण कधी उपलब्ध होणार, हे त्याने अजून कळवलेले नसल्यामुळे त्याचा विचार करण्यात आलेला नाही, देशांतर्गत सामने खेळल्यानंतर तो स्वतःला उपलब्ध करेल, असे द्रविड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT