No Question Of Removing Virat Kohli As RCB Skipper Says Mike Hesson 
क्रीडा

IPL 2020 : विराट कोहलीशिवाय RCB शक्यच नाही? कर्णधारपदावून काढण्याचा प्रश्नच येत नाही

वृत्तसंस्था

बंगळूर : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून विक्रमी कामगिरी करत असलेल्या विराट कोहलीला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाच्या नेतृत्वपदी अपयशच आले आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढील मोसमात त्याला कर्णधारपदावरून दूर करण्याची चर्चा सुरू झाली असताना संघाचे नवे संचालक माईक हेसन यांनी आरसीबीच्या नेतृत्वबदलाचा प्रश्‍न नाही, असे स्पष्टपणे सांगितले. 

विक्रमवीर विराट कोहली, एबी डिव्हिल्यर्स, ख्रिस गेल असे दादा फलंदाज असतानाही बंगळूर संघाला एकदाही आयपीएल जिंकता आलेली नाही.

सात मोसमात कोहलीने बंगळूर संघाचे नेतृत्व केले आहे. विराटला कर्णधारपदावरून दूर करण्याचा कोणताच विचार नाही. चुकांपासून बोध घेऊन प्रगती करण्यात विराट नेहमीच अग्रेसर असतो, असे हेसन यांनी सांगितले. संघाचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटीचही असाच विचार करत असल्याचे हेसन म्हणाले. 

नव्या खेळाडूंचा शोध घेणार 
हेसन यांनी आरसीबी संघात बदल करणार असल्याचे संकेत दिले.भारतातील राष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-20 अजिंक्‍यपद स्पर्धांवर आम्ही लक्ष ठेवणार आहोत. त्यातून नव्या खेळाडूंचा शोध घेणार आहोत, केवळ त्यांची कामगिरीच नव्हे तर ते दडपणाचा कसा सामना करतात, तंदुरुस्ती हे मुद्देही आम्ही पाहाणार आहोत, असे हेसन यांनी सांगितले. संघात निवड करताना सातत्याला आमचे प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना टाकला मोठा डाव! , आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत दिसणार 'हा' पक्ष!

मुलगी झाली हो...! कियारा आणि सिद्धार्थ झाले आई-बाबा, मल्होत्रा कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन!

heart-stopping footage : Video काळजाचा थरकाप उडवणारा! 'तो' ट्रॅकवर निपचित राहिला पडून अन् वरून धावती रेल्वे

आता ट्रेनच्या जनरल कोचमध्ये फक्त १५० प्रवाशांना तिकिटे मिळणार! रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

SCROLL FOR NEXT