Chandu Borde Sakal
क्रीडा

Chandu Borde : मेहनतीशिवाय यश मिळत नाही; माजी कर्णधार चंदू बोर्डे

‘प्रत्येक खेळामध्ये तुम्हाला तुमचे लक्ष्य साध्य करायचे असेल तर मेहनत घेतल्याशिवाय ते साध्य होणार नाही. प्रत्येक खेळात चुरस निर्माण झाली आहे. त्यासाठी प्रत्येक खेळाडूला आटोकाट प्रयत्न करावे लागणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : ‘‘प्रत्येक खेळामध्ये तुम्हाला तुमचे लक्ष्य साध्य करायचे असेल तर मेहनत घेतल्याशिवाय ते साध्य होणार नाही. प्रत्येक खेळात चुरस निर्माण झाली आहे. त्यासाठी प्रत्येक खेळाडूला आटोकाट प्रयत्न करावे लागणार आहेत. मेहनतीशिवाय यश मिळत नाही,’’ असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे यांनी व्यक्त केले.

चंदू बोर्डे फाउंडेशनच्या वतीने (सीबीएफ) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा शिष्यवृत्ती देऊन गौरव केला जातो. या प्रसंगी ते बोलत होते. या वर्षी पुण्यातील वैष्णवी पवार (तिरंदाजी), रेणुका साळवे (अंध ज्युदोपटू), राधिका दराडे (सायकलिंग), निकितासिंग, क्रिश शहापूरकर, रिषभ बन्सल, हर्षल मिश्रा (सर्व क्रिकेट) या सात विविध खेळातील खेळाडूंना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन चंदू बोर्डे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या वेळी विजया बोर्डे, उदय बोर्डे, वैशाली बोर्डे हे उपस्थित होते. चंदू बोर्डे यांनी आपले कुटुंब, तसेच मित्रपरिवाराच्या सहकार्याने चंदू बोर्डे फाऊंडेशनची स्थापना केली. क्रीडा, संस्कृती, कला आदी विभागात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गुणवान खेळाडूंचा गौरव करण्याचे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, ट्रम्प यांचा दावा; म्हणाले- पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलंय

'श्री' की 'जान्हवी' सगळ्यात जास्त संपत्ती कोणाकडे? तेजश्री प्रधान की शंशाक केतकर कोण आहे वरचढ?

BMC अ‍ॅक्टच्या नावाखाली महापालिका अधिकाऱ्यांची लाचखोरी... मुंबई ACB ने असा रचला सापळा!

Latest Marathi News Live Update : 'स्वाभिमानी'ची आज जयसिंगपुरात ऊस परिषद; महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकऱ्यांचे पहिल्या उचलीकडे लक्ष

Horoscope Prediction : सूर्य करणार तूळ राशीत प्रवेश ; या भ्रमणामुळे 5 राशींचे वाजणार तीन तेरा

SCROLL FOR NEXT