Wrestling Federation Of India Election Brij Bhushan Sharan Singh ESAKAL
क्रीडा

WWC : ना तिरंगा, ना राष्ट्रगीत! ब्रिजभूषणमुळं जागतीक कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये भारताची नाचक्की

जागतीक कुस्ती महासंघानं भारतीय कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जागतीक कुस्ती महासंघानं भारतीय कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द केलं आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका वेळेत होऊ न शकल्यानं भारतावर ही नामुष्की ओढवली आहे.

त्यामुळं आता भारतीय खेळाडूंना जागतीक कुस्ती महासंघाच्या निर्णयामुळं भारतीय खेळाडूंनी जागतीक कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये ना देशाचा राष्ट्रध्वज ना राष्ट्रगीताचा वापर करता येणार आहे. याला भाजपचे खासदार आणि कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह कारणीभूत ठरले आहेत. (No tricolour anthem at wrestling World Championship after world body suspends India)

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे विद्यमान सीईओ कल्याण चौबे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळं भारतीय कुस्तीपटूंना पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये सहभागी होता येईल पण त्यांना भारतीय झेंड्याखाली केळता येणार नाही, म्हणजेच त्यांना भारतीय खेळाडू म्हणून खेळता येणार नाही तर त्यांना तटस्थ खेळाडू म्हणून खेळता येईल.

जागतीक संघटनेनं काय म्हटलंय?

जागतीक कुस्ती महासंघानं भारतीय ऑलिम्पिक संघटनेला आपला निर्णय पत्र लिहून कळवला आहे. यावर भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "आम्हाला हे पत्र मिळालं असून यावर वर्ल्ड चॅम्पिअनशिपसाठी संघाच्या निवडणीबाबत भाविष्यातील भारताची भूमिका काय असेल हे ठरवलं जाईल" (Marathi Tajya Batmya)

निवडणुका होऊ शकल्या नाहीत

भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका 12 ऑगस्ट रोजी होणार होत्या. परंतू पंजाब आणि हरयाणा हायकोर्टानं मतदानाच्या एक दिवस आधी निवडणुकीला स्थगिती दिली होती. आसाम हायकोर्टानं भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. (Latest Marathi News)

याआधी 11 जुलै रोजी निवडणुका होणार होत्या, तेव्हा आसाम कुस्तीगीर संघटनेनं आपल्या मान्यतेबाबत कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर आसाम हायकोर्टानं निवडणुकीला स्थगिती दिली होती. त्यानंतर ऑगस्टमध्येही निवडणुका होऊ शकल्या नाहीत.

चार-पाच महिने चाललं आंदोलन

दरम्यान, महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात छेडलेलं आंदोलन चार-पाच महिने चालू होतं. त्यानंतर क्रीडा मंत्रालयानं फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं. पदाधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर महासंघाचं काम समिती पाहत होती.

पूर्वी फेडरेशनच्या निवडणुका 12 ऑगस्टला होणार होत्या. अध्यक्षपदासाठी 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अध्यक्षपदासाठी एका महिलेनेही अर्ज दाखल केला होता. अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करणाऱ्या संजय सिंह यांच्याबाबत बराच गदारोळ झाला होता. कारण संजय सिंह हे ब्रिजभूषण सिंह यांच्या जवळचे असल्याचे बोलले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT