Noah Lyles wins 100 meters in photo finish for first of possible four gold medals sakal
क्रीडा

Paris Olympics : 0.005 चा फरक! ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात रोमांचक 100 मीटर शर्यत; Video

Paris Olympics 2024 : अमेरिकेचा धावपटू नोहा लिल्स याने अखेर तेच केले ज्याची गेल्या महिनाभरापासून जगभरात चर्चा होत होती.

Kiran Mahanavar

Paris Olympics 2024 : अमेरिकेचा धावपटू नोहा लिल्स याने अखेर तेच केले ज्याची गेल्या महिनाभरापासून जगभरात चर्चा होत होती. पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीतील सर्वात रोमांचक शर्यतींपैकी एकामध्ये सुवर्णपदक जिंकून नोहा लायल्स हा जगातील सर्वात वेगवान पुरुष बनला आहे. श्वास रोखून धरणाऱ्या या 10 सेकंदांमध्ये जगातील अव्वल खेळाडूंमध्ये अशी स्पर्धा रंगली होती की, हा फरक एका सेकंदाच्या छोट्या पॉईंटवर ओळखता आला नाही.

हा सामना अतिशय चुरशीचा आणि रोमांचक होता. अमेरिकन धावपटू लायल्सने 9.784 सेकंदांच्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळेसह शर्यत पूर्ण केली, परंतु असे करणारा तो एकमेव धावपटू नव्हता. जमैकाचा धावपटू किशन थॉम्पसन यानेही त्याच वेळेत शर्यत पूर्ण केली, या दोन धावपटूंमध्ये फक्त 0.005 सेकंदांचा फरक होता, ज्यामुळे हा सामना ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात भारी ठरला. तर अमेरिकेचा धावपटू फ्रेड कर्लीने 9.81 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले.

पुरुष 100 मीटर अंतिम निकाल

सुवर्ण पदक : नोहा लायल्स (यूएसए) - 9.784 सेकंद

रौप्य पदक: किशन थॉम्पसन (जमैका) - 9.789 सेकंद

कांस्य पदक : फ्रेड केर्ली (यूएसए) - 9.810 सेकंद

त्याच वेळी, गेल्या वेळचा सुवर्णपदक विजेता इटलीच्या जेकब्स मार्सेलने 9.85 सेकंदात शर्यत पूर्ण करून हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली, परंतु तरीही तो पाचव्या स्थानावर राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT