Novak Djokovic Clinches Record 23rd Grand Slam esakal
क्रीडा

Novak Djokovic : जोकोविचनं इतिहास रचला; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला टेनिसपटू

अनिरुद्ध संकपाळ

Novak Djokovic Clinches Record 23rd Grand Slam : नोव्हाक जोकोविजने फ्रेंच ओपन फायनलमध्ये कॅस्पर रूडचा पराभव करत आपले 23 वे ग्रँडस्लॅम जिंकले. तो आता 23 ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला पुरूष टेनिसपटू ठरला आहे. त्याने राफेल नदालचे 22 ग्रँडस्लॅम जिंकण्याचे रेकॉर्ड मागे टाकले. (Novak Djokovic defeated Casper Ruud In French Open 2023)

फ्रेंच ओपन 2023 च्या पुरूष एकेरीच्या फायनलध्ये सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने कॅस्पर रूडचा 7-6 (7-1), 6-3, 7-5 असे तीन सेटमध्ये पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये कस्परने आघाडी घेत नोव्हाक जोकोविचचे टेन्शन वाढवले होते. मात्र जोकोविचने पहिला सेट 7-6 (7-1) असा जिंकत जोरदार पुनरागमन केले.

त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने कॅस्परला पुनरागमनाची संधी न देता सेट 6 - 3 असा आपल्या नावावर केला. मात्र तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये कॅस्परने जोकोविचला चांगलेच झुंजवले. अखेर कॅस्परची कडवी झुंज मोडून काढून तिसरा सेट 7 - 5 असा जिंकत इतिहास रचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : जम्मू-पठाणकोट महामार्गाजवळील सहर खड नदीवरील खचला

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT