Australian Open final 
क्रीडा

Australian Open final: जोकोविचचे सर्वस्व पणाला; नदालशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न

जोकोविच आणि सितत्सिपास यांच्यामध्ये उद्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅममधील पुरुष एकेरी गटाची अंतिम फेरी रंगणार

सकाळ डिजिटल टीम

सर्बीयाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि ग्रीसचा स्टेफानोस सितत्सिपास यांच्यामध्ये उद्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅममधील पुरुष एकेरी गटाची अंतिम फेरी रंगणार आहे. या वेळी जोकोविच २२ व्या मँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घालून राफेल नदाल याच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदांनदालशी बरोबरीचेच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसणार आहे. स्टेफानोस मात्र आपल्या पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम अजिंक्यपदासाठी झटणार आहे. (Novak Djokovic faces Stefanos Tsitsipas in Australian Open final with records on the line)

याआधी जोकोविच व स्टेफानोस यांच्यामध्ये एक वेळा ग्रँडस्लॅमची अंतिम फेरीची लढत आहे. २०२१ मध्ये फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत जोकोविचने स्टेफानोसला हरवले. जोकोविचला दहाव्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचेही वेध लागले आहेत.

असे झाल्यास ग्रँडस्लॅम दहा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा जिंकणारा तो तिसराच टेनिसपटू ठरणार आहे. याआधी राफेल नदाल याने फ्रेंच ओपन १४ वेळा आणि मार्गरेट कोर्ट हिने ऑस्ट्रेलियन ओपन ११ वेळा जिंकली आहे.

सहावा खेळाडू ठरण्याची संधी

स्टेफानोस सितत्सिपास आणि नोवाक जोकोविच यांच्यामध्ये झालेल्या १२ लढतींपैकी ९ लढतींमध्ये जोकोविच याने यश मिळवले आहे. स्टेफानोस याने २०१९ मध्ये शांघाय मास्टर्स स्पर्धेमध्ये जोकोविचला अखेरचे नमवले होते.

तसेच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत जोकोविचला हरवणारा सहावा खेळाडू ठरण्याची संधीही त्याच्याकडे असणार आहे. याआधी रॉजर फेडरर, राफेल नदाल, अँडी मरे, स्टॅन वावरिंका, डॅनिल मेदवेदेव या टेनिसपटूनी जोकोविचला ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पराभूत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shakti Cyclone : अतिवृष्टीनंतर आणखी एक अस्मानी संकट! 'शक्ती' चक्रीवादळ महाराष्ट्राच्या वेशीवर, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा...

Cheque Clearance Rule: आरबीआयचा मोठा निर्णय; आजपासून चेक लगेच क्लिअर होणार, बँकिंग सिस्टीममध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता; हवामानशास्त्र तज्ज्ञ डॉ. डाखोरे यांचा इशारा

AVN Disease: एव्हीएन प्रमुख कारण, अत्याधुनिक उपचारांनी सर्वसामान्य आयुष्य जगणे शक्य; तारुण्यातच ‘हिप जॉइंट रिप्लेसमेंट

Sangli Politics : शरद पवार गटाला सांगलीत मोठा धक्का! आमदार पूत्र करणार भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT