Novak Djokovic  sakal
क्रीडा

Novak Djokovic : क्षणिक रागाची किंमत साडेसहा लाख रुपये..., रॅकेट आपटणे जोकोविचला पडले महाग

अनेकदा रॅकेट आपटून तो आपला राग कोर्टवर व्यक्त करत असतो पण..

सकाळ ऑनलाईन टीम

Novak Djokovic : नोवाक जोकोविच कितीही थोर आणि विक्रमवीर टेनिसपटू असला तरी रागावर त्याचे नियंत्रण राहत नाही. अनेकदा रॅकेट आपटून तो आपला राग कोर्टवर व्यक्त करत असतो. रविवारी झालेल्या विम्बल्डन अंतिम सामन्यात असाच काही क्षणाचा राग त्याला महागात पडला. त्यासाठी त्याला ६,११७ युरोंचा दंड करण्यात आला. भारतीय रुपयात ही रक्कम ६ लाख ५७ हजार इतकी आहे.

रविवारी विम्बल्डन सेंटर कोर्टवर झालेला जोकोविच आणि अल्काराझ यांच्यातील सामना कमालीचा चुरशीचा झाला. यात अल्काराझने १-६, ७-६, ६-१, ३-६, ६-४ असा पाच सेटमध्ये विजय मिळवत जोकोविचला दोन विक्रमांपासून रोखले. त्यामुळे त्याला रॉजर फेडररच्या आठ विम्बल्डन विजेतेपदाशी बरोबरी साधता आली नाही आणि सर्वाधिक २४ ग्रँड स्लॅम विजेतेदाच्या मार्गारेट कोर्ट यांच्याशी विक्रमाशी बरोबरी साधता आली नाही.

जोकोविचसाठी हा अंतिम सामना जिंकणे सर्वार्थाने महत्त्वाचे होते. सामना संपल्यानंतर त्याने विजेत्या अल्काराझची मुक्तकंठाने स्तूस्ती केली, परंतु एका क्षणी व्यक्त केलेला राग त्याला भलताच महागात पडला.

पाचव्या आणि अंतिम सेटमध्ये हा प्रकार घडला. या सेटमध्ये जो सर्व्हिस भेदणार होता त्याला आघाडी घेण्याची संधी मिळणार होती, परंतु संधी असताना जोकोविच अल्काराझची सर्व्हिस भेदू शकला नाही आणि लगेचच स्वतःची सर्व्हिस राखू शकला नाही. हा राग त्याने रॅकेटवर काढला. त्याने स्वतःची रॅकेट नेट पोलवर जोरात मारली, त्यामुळे पोलला पोक आलेच आणि रॅकेटही तुटली.

चेअर अंपायर फर्ग्युस मर्फी यांनी प्रथम जोकोविचलला नियमाचा भंग केल्याची ताकीद दिली आणि त्यानंतर ६,११७ युरोचा दंड केला. ही रक्कम जोकोविचला उपविजेतेपदासाठी मिळालेल्या १.१७५ दशलक्ष पौंड (सुमारे ११ लाख रुपायांपेक्षा अधिक) रकमेतून कापून घेण्यात आली.

या अंतिम सामन्यात जोकोविचला दोनदा ताकीद देण्यात आली. यातील पहिली ताकीद त्याने वेळेत सर्व्हिस केली नव्हती आणि दुसरी ताकीद रॅकेट आपटल्याबद्दल होती. ब्रेक पॉइंट मी जिंकू शकलो नाही याचा राग मला आला आणि त्यातून ही कृती घडली, अशी कबुली जोकोविचने दिली.

स्पर्धेतूनच झाला होता बाद

रागामुळे चेंडू जोरात मारल्याचा आणखी एक मोठा फटका जोकोविचला बसलेला आहे. २०२० च्या यूएस ओपन स्पर्धेत त्याने रागाने विनाकारण जोरात मारलेला चेंडू लाईनमन जजच्या कंठाला लागला, त्यामुळे जोकोविचला स्पर्धेतून बाद करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT