Novak-Djokovic 
क्रीडा

जोकोविचची सुटका करा, व्हिसा परत द्या; न्यायालयाचा ऑस्ट्रेलिया सरकारला आदेश

सकाळ डिजिटल टीम

टेनिस कोर्टवर अधिराज्य गाजवणाऱ्या जोकोविचचा ऑस्ट्रेलिया सरकारविरोधातील न्यायालयीन लढ्यातही विजय झाला आहे.

मेलबर्न - टेनिस कोर्टवर अधिराज्य गाजवणाऱ्या जोकोविचचा ऑस्ट्रेलिया सरकारविरोधातील न्यायालयीन लढ्यातही विजय झाला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत नंबर वन टेनिस स्टार नोवाक जोकोविचचा व्हिसा ऑस्ट्रेलियन सरकारने रद्द केला होता. तसंच त्याला हॉटेलमध्ये विलिगीकरणात ठेवण्यात आलं होतं. याविरोधात जोकोविचने न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सुनावणीवेळी न्यायालयाने जोकोविचला तात्काळ सोडण्याचे आणि त्याचा व्हिसा परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालायने जोकोविचच्या बाजुने निकाल देताना व्हिसा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. तसंच याबद्दल सरकारने जोकोविचला नुकसानभरपाई द्यावी असेही न्यायालयाने सांगितलं आहे.

न्यायालयाने जोकोविचला प्रश्न विचारला की, कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी तो आणखी काय करू शकत होता? यावर जोकोविचच्या वतीने वकिलांनी माहिती देताना सांगितलं की, जोकोविचला लसीकरणाचे पुरावे देण्याची गरज नाही कारण त्याच्याकडं गेल्याच महिन्यात कोरोनाची लागण झाल्याचा पुरावा आहे. तसंच टेनिस ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आलेली वैद्यकीय सूट आणि त्याची कागदपत्रेही विमानतळावर देण्यात आली होती. यापेक्षा अधिक काही करता येऊ शकत नव्हतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT