Novak Djokovic to play Carlos Alcaraz in Wimbledon final sakal
क्रीडा

Novak Djokovic : विम्बल्डनच्या फायनलमध्ये नोव्हाक जोकोविचने थाटात मारली एन्ट्री! ट्रॉफीसाठी 'गतविजेत्या'शी भिडणार

Wimbledon 2024 Men's Final : टेनिस कारकिर्दीत नोव्हाक जोकोविच 10व्यांदा विम्बल्डनचा अंतिम सामना खेळणार आहे.

Kiran Mahanavar

Wimbledon Final 2024 : विम्बल्डन 2024 मध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात गतविजेता कार्लोस अल्काराझ आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच भिडणार आहे. या दोघांमध्ये 14 जुलै रोजी विजेतेपदाचा सामना रंगणार आहे.

जोकोविचने उपांत्य फेरीच्या सामन्यात लॉरेन्झ मुसेट्टीचा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात जोकोविचला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले असले तरी शेवटी तो विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आणि टेनिस कारकिर्दीत तो 10व्यांदा विम्बल्डनचा अंतिम सामना खेळणार आहे.

विम्बल्डन 2024 सुरू होण्याच्या अवघ्या 5 आठवड्यांपूर्वी नोव्हाक जोकोविचच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीकडे लागल्या होत्या. उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोविचने तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात इटालियन खेळाडू मुसेट्टीचा पराभव केला. यामध्ये पहिला सेट 6-4 असा संपला, दुसरा सेट 7-6 (7/2) असा संपला, तर जोकोविचने तिसरा सेट 6-4 ने जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

जोकोविचने आतापर्यंत 7 वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले असून, या वेळीही तो जिंकला तर तो महान टेनिसपटू रॉजर फेडररच्या सर्वाधिक विम्बल्डन विजेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी करेल.

सध्या गतविजेता असलेल्या कार्लोस अल्काराझची टेनिस कोर्टवर यावेळीही उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली. स्पेनच्या या पठ्ठ्याने शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याच्यावर चार सेटमध्ये मात करीत जेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली. अल्काराझ याने 6-7, 6-3, 6-4, 6-4 असा विजय साकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT