Novak Djokovic withdraws from Indian Wells and Miami tournaments sakal
क्रीडा

जोकोविचची निर्बंधांमुळे स्पर्धेतून माघार

ऑस्ट्रेलिया पाठोपाठ अमेरिकेतील स्पर्धेसाठीही लसीकरण नाहीच

सकाळ वृत्तसेवा

इंडियन वेल्स : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोविचने बीएनपी पारिबास व मियामी खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतल्याची पुष्टी बुधवारी आयोजकांनी केली. ‘‘अमेरिकेतील आरोग्य यंत्रणांनी नियम बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे मी तिथे खेळू शकणार नाही.’’ असे, २०-वेळचा ‘ग्रँड स्लॅम’ चॅम्पियन असणाऱ्या जोकोविचने बुधवारी ट्विट करत म्हटले होते. जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत लसीकरण न करता आपल्या विजेतेपदाचा बचाव करण्यासाठी गेलेल्या जोकोविचची ऑस्ट्रेलियन सरकारकडून हकालपट्टी करण्यात आली होती.

त्यामुळे राफेल नदालने मिळालेल्या संधीचा फायदा घेत, त्याच्या विक्रमी ‘ग्रँड स्लॅम’ जेतेपदाला गवसणी घातली. परिणामतः जोकोविचची एटीपी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली तर डॅनिल मेदवेदेव अव्वल ठरला.

‘‘मला स्वयंचलितपणे बीएनपी पारिबास ओपन व मियामी ओपनमध्ये ड्रॉ मिळाला होता; परंतु अमेरिकन सरकारचे आरोग्याबाबतचे नियम कायम असताना मी या स्पर्धेमध्ये खेळू शकणार नाही. या स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या सर्वांना शुभेच्छा,’’ असे ट्विटमध्ये जोकोविचने पुढे म्हटले आहे.

जोकोविचने माघार घेतल्यामुळे ग्रिगोर दिमित्रोव्ह आता ३३ वा मानांकित होईल आणि जोकोविचचे स्थान ड्रॉमध्ये शेवटच्या ओळीत जाईल.

‘बीएनपी पारिबास ओपन’ पात्रता स्पर्धेची अंतिम फेरी बुधवारी खेळली जात आहे, तर कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात गुरुवारी वर्षातील पहिल्या ‘एटीपी मास्टर्स १०००’ ची स्पर्धा असणाऱ्या मियामी ओपन स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT