Australian Open novak djokovic
Australian Open novak djokovic 
क्रीडा

Australian Open: जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून रचला इतिहास! राफेल नदालची केली बरोबरी

Kiran Mahanavar

Novak Djokovic Won Australian Open 2023 : ऑस्ट्रेलियन ओपन 2023 जिंकून नोव्हाक जोकोविचने इतिहास रचला आहे. त्याने विक्रमी 10व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन 2023 जिंकली आहे. पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत त्याने ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपासचा 6-3, 7-6, 7-6 असा पराभव केला. जोकोविच 22वे ग्रँडस्लॅम जिंकले आणि यासोबत त्याने राफेल नदालची बरोबरी केली.

ऑस्ट्रेलियन ओपन 2023 मधील पुरुष एकेरीच्या विजेतेपदाचा सामना नोव्हाक जोकोविच आणि स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यात खेळला गेला. अंतिम सामन्यात जोकोविचने शानदार सुरुवात करत पहिला सेट 6-3 अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरदार झुंज दिली, पण शेवटी जोकोविचने 7-6 अशा फरकाने विजय मिळवला. तिसर्‍या सेटमध्येही त्‍सित्‍सिपासने पुनरागमन करण्‍याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु जोकोविचवर मात करू शकला नाही आणि जोकोविचने 7-6 अशा फरकाने सामना जिंकला. या विजयासह तो एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला.

ऑस्ट्रेलियन ओपन सर्वाधिक वेळा जिंकणारा जोकोविच

जोकोविचने 10व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल खेळली. याआधी जोकोविचने नऊ वेळा या ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती आणि प्रत्येक वेळी विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने 2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019, 2020 आणि 2021 मध्ये विजेतेपद पटकावले होते. 2022 मध्ये जोकोविच व्हिसाच्या कारणांमुळे ही स्पर्धा खेळू शकला नव्हता. त्यावेळस राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले होते.

जोकोविचने राफेल नदालची केली बरोबरी

जोकोविच 22वे ग्रँडस्लॅम जिंकले आहे. आता त्याने दहा ऑस्ट्रेलियन ओपन, दोन फ्रेंच ओपन, सात विम्बल्डन आणि तीन यूएस ओपनसह एकूण 22 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत त्याने राफेल नदालची बरोबरी केली आहे. नदालकडे 22 ग्रँडस्लॅम आहेत. त्याचबरोबर रॉजर फेडरर 20 ग्रँडस्लॅमसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT