shoaib akhtar esakal
क्रीडा

पैगंबर वाद : शोएब अख्तरने भारत सरकारच्या निर्णयाचे केले स्वागत

पैगंबर मोहम्मद प्रकरणावर पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरने आपले मत व्यक्त केलं आहे.

धनश्री ओतारी

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या विवाहासंबंधी आक्षेपार्ह विधान केलं आणि त्याचे पडसाद आता जगभरात उमटतायत. या प्रकरणी नुपूर शर्मा यांना भाजपमधून निलंबीत करण्यात आलं आहे. दरम्यान, भारतातच्या या वादावर पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरने आपले मत व्यक्त केलं आहे. या प्रकरणासंदर्भात भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेचे त्याने स्वागत केलं आहे.

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पक्षाने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर भाजपने भाजप निवेदन जारी केलं. यामध्ये अशा कोणत्याही विचारावर विश्वास ठेवत नाही किंवा प्रोत्साहन देत नाही. शर्मा यांच्या वक्तव्याबाबत मुस्लिम समाजात संताप व्यक्त होत आहे . भारताच्या हजारो वर्षांच्या प्रवासात प्रत्येक धर्माचा विकास आणि भरभराट झाली आहे. भाजपचा सर्वपंथ समभावावर विश्वास आहे. कोणत्याही धर्माच्या उपासकांचा अपमान भाजपला मान्य नाही ''

तसेच देशातील संविधानाचीही भारतातील प्रत्येक नागरिकाने सर्व धर्मांचा आदर करावे अशी अपेक्षित आहे. सिंग म्हणाले, 'स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात या अमृत काळात 'एक भारत, श्रेष्ठ भारत' ही भावना सतत दृढ करत असताना देशाची एकता, अखंडता आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे आहे. असे म्हटले होते.

भाजप सरकारने घेतलेल्या या भूमिकेचे शोएब अख्तरने कौतुक केलं आहे. त्याने ट्विटमध्ये यावर प्रतिक्रिया केली आहे. 'प्रेषित मुहम्मद यांचा आदर आमच्यासाठी सर्वस्व आहे. आमचे जगणे आणि मरणे आणि आपण जे काही करतो ते फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आहे. आमचे प्रिय प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल सांगितलेल्या अपमानास्पद शब्दांचा मी तीव्र निषेध करतो. हे लज्जास्पद कृत्य करणाऱ्यांना निलंबित करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. भारत सरकारने अशा लोकांवर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत. असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT