NZ vs PAK 1st Semi-Final  sakal
क्रीडा

NZ vs PAK : आम्ही कशाला जिंकू, आम्ही थोडीच भारताविरोधात सामना खेळातोय..., मीम्स व्हायरल

न्यूझीलंडने 2019 च्या वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव केला

सकाळ ऑनलाईन टीम

T20 WC 2022: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली.

स्फोटक फिन अॅलन पहिल्याच षटकात अवघ्या चार धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर डेव्हॉन कॉनवे 21 धावांवर बाद झाला आणि ग्लेन फिलिप्सने सहा धावा केल्या. 49 धावांत तीन गडी गमावल्यानंतर किवीज संघ गडगडला होता. न्यूझीलंडची अशी अवस्था झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल व्हायला सुरुवात झाली. एका चाहत्याने लिहिले की आम्ही कशाला जिंकू, आम्ही थोडीच भारताविरोधात सामना खेळातोय. न्यूझीलंडने 2019 च्या वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पहिल्याच षटकात फिन अॅलन बाद झाल्यानंतर किवी कर्णधार केन विल्यमसन क्रमांकावर फलंदाजीला आला. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरेल मिशेल यांनी 68 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 117 धावांपर्यंत नेली. केन विल्यमसन 42 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. तर डॅरिल मिशेलने 35 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या. शेवटी जेम्स नीशमने 12 चेंडूत 16 धावा करत न्यूझीलंडची धावसंख्या 4 बाद 152 पर्यंत नेली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने दोन बळी घेतले. मोहम्मद नवाजला एक विकेट मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT