Finn Allen 16 Sixes Marathi News sakal
क्रीडा

Finn Allen 16 Sixes : आरारारा खतरनाक...! एकट्या पठ्ठ्याने ठोकले 16 षटकार अन् पाकिस्तानला आणले रडकुंडीला

फिन ऍलनचा धुमधडाका: षटकारांच्या वर्षावाने पाकिस्तानचे धाबे दणाणले

Kiran Mahanavar

Nz vs Pak 3rd T20 : सध्या पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघ पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहेत. आज (17 जानेवारी) ड्युनेडिनमध्ये तिसरा टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडचा खेळाडू फिन ऍलनने पाकिस्तानला अक्षरशः रडकुंडीला आणले.

या सामन्यात त्याने 16 षटकार मारले. यापूर्वी, अफगाणिस्तानचा खेळाडू हजरतुल्ला झाझाईने 23 फेब्रुवारी 2019 रोजी डेहराडूनमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात 16 षटकार ठोकले होते. एकप्रकारे हा विश्वविक्रम मोडीत निघणार होता. पण फिन ऍलनने या विक्रमाची बरोबरी केली.

फिन ऍलन हा किवी संघाचा सलामीचा फलंदाज आहे. आणि आज तो वेगळ्याच मूडमध्ये होता, त्याने बाद होण्यापूर्वी 137 धावांची खेळी केली. अॅलनने आपल्या डावात 62 चेंडूंचा सामना करत 16 षटकार ठोकले, तर त्याच्या खेळीत 5 चौकारांचाही समावेश होतो. आणि त्याचा स्ट्राइक रेटही 220.96 होता. 24 वर्षीय अॅलन त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या फलंदाजीमुळे न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात 224 धावा केल्या.

फिन ऍलनने आतापर्यंत 22 एकदिवसीय सामन्यांमध्ये 93.26 च्या स्ट्राइक रेट आणि 27.71 च्या सरासरीने न्यूझीलंडसाठी 582 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 38 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जिथे त्याने 26.97 च्या सरासरीने आणि 165.05 च्या स्ट्राईक रेटने 1025 धावा केल्या आहेत.

एका टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार

  • फिन ऍलन (न्यूझीलंड) - 16 षटकार विरुद्ध पाकिस्तान, 2024

  • हजरतुल्ला झाझाई (अफगाणिस्तान) – 16 षटकार विरुद्ध आयर्लंड, 2019

  • झीशान कुकीखेल (हंगेरी) – 15 षटकार विरुद्ध ऑस्ट्रिया, 2022

  • अॅरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) - 14 षटकार विरुद्ध इंग्लंड, 2013

  • जॉर्ज मुन्से (स्कॉटलंड) – 14 षटकार विरुद्ध नेदरलँड्स, 1019

  • रिचर्ड लेव्ही (दक्षिण आफ्रिका) – 13 षटकार विरुद्ध न्यूझीलंड, 2012

(Most sixes in a T20 International match)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT