ODI World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2023 ला 100 दिवसांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. भारतीय संघासह सर्व संघ वर्ल्डकपच्या तयारीला लागले आहेत. भारत इतिहासात पहिल्यांदाच एकटा एवढ्या मोठ्या आयसीसी इव्हेंटचे आयोजन करणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने देखील यंदाचा वर्ल्डकप ग्रँड करण्यासाठी कंबर कसली आहे.
वर्ल्डकपचे सामने हे 10 स्टेडियमवर होणार आहेत. या 10 स्टेडियमचा काया पालट करण्यासाठी बीसीसीआयने 500 कोटी रूपयांचे अतिरिक्त बजेट बाजूला काढून ठेवले आहे. वर्ल्डकप 2023 चे सामने हे अहमदाबाद, चेन्नई, मुंबई, धर्मशाला, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, लखनौ आणि कोलकाता येथे होणार आहेत. तर गुवाहाटी आणि तिरूवअनंतपुरम येथे सराव सामने होणार आहेत.
या सर्व स्टेडियमच्या गरजा पाहून ते उद्यावत करण्याची योजना आखली आहे. स्टेडियममध्ये एलईडी लाईट्स पासून आसन व्यवस्था या सर्वांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक स्टेडियमला प्रत्येकी 50 कोटी रूपये मिळणार आहेत.
वानखेडेची आऊटफिल्ड देखील सुधारणार
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या आऊटफिल्डवर पावसाचे पाणी साचते. त्यामुळे आता वर्ल्डकपच्या तोंडावर ही आऊटफिल्ड देखील बदलण्यात येणार आहे. याचबरोबर मैदानातील एलईडी लाईट्स आणि कॉरपोरेट बॉक्स देखील अपग्रेड करण्यात येईल.
याचबरोबर छत नसलेल्या स्टेडियमवर देखील छत बसवण्यात येणार आहे. पार्किंग स्पेस वाढवण्यात येईल तसेच आसन व्यवस्था देखील बदलण्यात येईल.
चेन्नईमध्ये नवीन खेळपट्टी
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये दोन लाल मातीच्या खेळपट्ट्या तयार करण्यात येणार आहे. आयपीएलवेळी या खेळपट्टीवर खूप टीका झाली होती. याचबरोबर या स्टेडियमवर नव्या फ्लड लाईट्स देखील लावल्या जाणार असून बाथरूम पासून स्टँड पर्यंतच्या साफ सफाईवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.