World Cup 2023 India Vs Pakistan Schedule  esakal
क्रीडा

World Cup 2023 India Vs Pakistan : या दिवशी भारत - पाकिस्तान भिडणार; अंस असेल भारताचं संभाव्य शेड्युल

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 India Vs Pakistan Schedule : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पदरी निराशा पडल्यानंतर आता भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपबाबत क्रिकेट चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार बसीसीआयने आयसीसीला वनडे वर्ल्डकपच्या वेळपत्रकाचा ड्राफ्ट पाठवला आहे. हे वेळापत्रक निश्चित होण्यापूर्वी वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या देशांकडून यावर प्रतिक्रिया मागवण्यात येणार आहे. वर्ल्डकपचे वेळापत्रक पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या ड्राफ्टनुसार वर्ल्डकप हा 5 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड उपविजेत्या न्यूझीलंडशी भिडणार आहे. तर वर्ल्डकपची फायनल ही 19 नोव्हेंबरला होईल. सेमी फायनल हे 15 आणि 16 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. मात्र अजून त्याचे ठिकाण निश्चित झालेले नाही.

भारत यंदाचा वनडे वर्ल्डकप आयोजित करणार असून भारताने गेल्यावेळी वर्ल्डकप 2011 मध्ये आयोजित केला होता. त्यावेळी भारताने वर्ल्डकप जिंकला होता. यंदाही भारतीय संघाकडून अशीच अपेक्षा आहे. भारत यंदाच्या वर्ल्डकपमध्ये लीग स्टेजमध्ये 9 सामने खेळणार आहे. भारत आपली वर्ल्डकप मोहिम ही ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळून सुरू करणार आहे.

भारताचे वर्ल्डकपमधील संभाव्य वेळापत्रक

  • भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया 8 ऑक्टोबर, चेन्नई

  • भारत विरूद्ध अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर, दिल्ली

  • भारत विरूद्ध पाकिस्तान, 15 ऑक्टोबर, अहमदाबाद

  • भारत विरूद्ध बांगलादेश, 19 ऑक्टोबर, पुणे

  • भारत विरूद्ध न्यूझीलंड, 22 ऑक्टोबर, धरमशाला

  • भारत विरूद्ध इंग्लंड, 29 ऑक्टोबर, लखनौ

  • भारत विरूद्ध पात्र झालेला संघ, 2 नोव्हेंबर, मुंबई

  • भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका, 5 नोव्हेंबर, कोलकाता

  • भारत विरूद्ध पात्र झालेला दुसरा संघ, 11 नोव्हेंबर, बंगळुरू

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT