ODI World Cup 2023 ESAKAL
क्रीडा

ODI World Cup 2023 : पुन्हा एकदा भारत - श्रीलंका फायनल... धोनी जिंकला रोहित कित्ता गिरवणार का?

अनिरुद्ध संकपाळ

ODI World Cup 2023 Final : 2 एप्रिल 2011 प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या वानखेडेवर महेंद्रसिंह धोनीने षटकार मारला अन् भारताचा 28 वर्षांचा दुष्काळ संपला. भारताने 1983 नंतर पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप उंचावला. या घटनेला आता एक तप उलटून गेले आहे. मात्र या क्षणाची पुनरावृत्ती झालेली नाही.

2011 चा वर्ल्डकप भारतात झाला होता. त्यावेळी भारत आणि श्रीलंका हे दोन आशिया खंडातील देश फायनलमध्ये आले होते. आता 2023 चा वर्ल्डकप देखील भारतात होत आहे. त्यामुळे यंदाही आशियातील दोन संघ फायलन खेळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

श्रीलंकेचा माजी खेळाडू निरोशन डिक्वेला याच्या मते यंदाच्या वनडे वर्ल्डकपची फायनल देखील भारत आणि श्रीलंका यांच्यातच होईल. (India Vs Sri Lanka World Cup 2023 Final)

श्रीलंकेचा क्रिकेटपटू निरोशन डिक्वेला याने आशा व्यक्त केली आहे की यंदाच्या वर्ल्डकपची फायलन देखील भारत आणि श्रीलंका यांच्यातच होईल. येत्या 5 ऑक्टोबरला भारतात वनडे वर्ल्डकपची सुरूवात होत आहे. वर्ल्डकपची सुरूवात गतविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना हा वानखेडेवरच 2 नोव्हेंबरला होणार आहे.

दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत श्रीलंकेचा डिक्वेला म्हणाला की, 'यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये देखील भारत आणि श्रीलंका अशी फायनल होईल अशी आशा करतोय. जो कोणी प्रक्रिया, मुलभूत गोष्टी योग्य प्रकारे अंमलात आणेल, चांगलं क्रिकेट खेळेल तो जिंकेल. आम्ही आमच्यावर जास्त लक्ष देणार आहे विरोधी संघांवर नाही.'

वर्ल्डकपपूर्वी आशियातील सर्व संघ हे आशिया कपमध्ये एकमेकांना भिडणार आहेत. ही एकप्रकारे वनडे वर्ल्डकपची रंगीत तालीमच असणार आहे. गेल्या आशिया कपमध्ये श्रीलंका फायनलमध्ये पोहचला होता. गेल्या वर्षाचा आशिया कप हा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता.

श्रीलंका अंतिम फेरीत अनपेक्षितरित्या पोहचला होता. त्यानंतर त्यांनी ट्रॉफी देखील जिंकली. दुबईत झालेल्या फायनल सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला होता.

याबाबत बोलताना डिक्वेला म्हणाला की, 'फेव्हरेट संघ होण्यापेक्षा अंडरडॉग्स असणं कधीही चांगलं. आम्हाला योग्य प्रक्रिया फॉलो करावी लागले. याचबरोबर होमवर्क करून रणनिती आखावी लागले. आम्ही योग्य सराव आणि होमवर्क केला आहे.'

'गेल्या आशिया कपमध्ये श्रीलंकेने या सर्व गोष्टी केल्या होत्या. त्यामुळेच आशिया कपमध्ये श्रीलंका जिंकू शकली. फेव्हरेट असण्यापेक्षा अंडरडॉग्स असणे कधीही चांगले.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

अग्रलेख : डिजिटल अरेस्ट

AFG vs SL Live : श्रीलंकेचा 'कुशल' विजय! अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात; बांगलादेशला लागली लॉटरी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT