ODI World Cup 2023 Mascots esakal
क्रीडा

ODI World Cup 2023 Mascots : आयसीसीकडून वर्ल्डकपच्या शुभंकरचे अनावरण; नामांकरणाची जबाबदारी मात्र चाहत्यांची

अनिरुद्ध संकपाळ

ODI World Cup 2023 Mascots : आयसीसीने आज (दि. 19) गुरूग्राम येथील एका कार्यक्रमात भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या शुभंकरचे अनावरण केले. यावेळी 19 वर्षाखालील वर्ल्डकप विजेत्या भारतीय महिला आणि पुरूष संघाचे कर्णधार शफाली वर्मा आणि यश धूल हे देखील उपस्थित होते.

आयसीसीनुसार नाव न ठेवलेला पुरूष आणि महिला शुभंकर हा स्त्री पुरूष समानतेचं प्रतिक आहे. आयसीसीचे इव्हेंट हेड ख्रिस टेट्ले यांनी सांगितले की, 'आम्हाला आयसीसी पुरूष वर्ल्डकप 2023 चा आयसीसी शुभंकर लाँच करताना अत्यानंद होत आहे.'

'हा शुभंकर हा संस्कृती आणि सीमांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र करण्याचं काम करणाऱ्या क्रिकेटचं उत्तम प्रतिक आहे. हा शुभंकर दोन्ही स्त्री आणि पुरूषांचे प्रतिनिधित्व करत आहे. हा जगात स्त्री - पुरूष समानतेचा संदेश देत आहे.'

ख्रिस पुढे म्हणाले की, 'आयसीसीचा उद्येश हा क्रिकेटचा प्रसार पुढच्या पिढीमध्ये देखील करण्याचा आहे. या उद्येश आयसीसीचा शुभंकर योग्य प्रकारे साध्या करत आहे. या शुभंकरद्वारे मुलांमध्ये क्रिकेटबद्दल दीर्घकालीन प्रेम निर्माण होईल.'

आयसीसीने शुभंकर अनावरण कार्यक्रमावेळीच या शुभंकरला नाव देण्यासाठी एका स्पर्धेची देखील घोषणा केली. ही स्पर्धा 27 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. चाहत्यांना या शुभंकरला नाव देत वर्ल्डकपवर आपली छाप सोसडण्याची संधी देखील आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITMS System : समृद्धी महामार्गावर बेशिस्त वाहनचालकांना बसणार आळा, काय ITMS प्रणाली? जाणून घ्या

कान्स सोहळ्याला अशोक सराफ यांच्या लेकाचीही उपस्थिती, आईसोबत शेअर केला फोटो, म्हणाला...

Pet Care : तुम्हाला तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी वाटते ना? 'हे' 5 स्वस्तातले स्मार्ट गॅजेट्स, ट्रॅकिंग अन् सुरक्षेसाठी बेस्ट

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये इंधनाचा तुटवडा, अनेक पेट्रोल पंप बंद

Farmer Son Success Story: शेतकरी पुत्र सय्यद शाहेदची PSI पदाला गवसणी; जिद्द आणि मेहनतीचे यश, कोणतीही अकॅडमी नाही, तरीही परीक्षेत मोठे यश..

SCROLL FOR NEXT