Virat Kohli Virat Kohli
क्रीडा

कोहलीच्या मुलीबाबत आक्षेपार्ह ट्विट; महिला आयोगाकडून पोलिसांना नोटीस

भारत पाकिस्तान सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर विराटच्या मुलीला धमकी देण्यात आली होती.

सुधीर काकडे

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या मुलीला ऑनलाइन धमक्या आल्या होत्या, त्यासंदर्भात दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. विराट कोहलीच्या 9 महिन्यांच्या मुलीबद्दल ट्विटरवर ज्या प्रकारे धमक्या आल्या ते अतिशय लाजिरवाणे असल्याचे स्वाती मालीवाल यांनी सांगितले आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी "नऊ महिन्यांच्या मुलीला ज्या प्रकारे धमकावण्यात आले ते अत्यंत लज्जास्पद आहे. आम्ही दिल्ली पोलिसांना या प्रकरणातील तपासाशी संबंधित माहिती देण्याची विनंती केली" असल्याचे ट्विटरवरून सांगितले आहे. भारताच्या या क्रिकेट संघाच्या कामगिरीमुळे आपल्याला हजारोवेळा अभिमान वाटला, मात्र पराभव होताच अशी वागणुक का? असा प्रश्न उपस्थित करत, आपण दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली असून, "नऊ महिन्यांच्या मुलीला धमकावणाऱ्या सर्वांना अटक करा!" असे सांगितले आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नोटीसची प्रत देखील शेअर केली आहे. जर कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आली नसेल तर कृपया आरोपीला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी काय पावले उचलली आहेत याची माहिती द्या. यासंदर्भात पोलिसांना ८ नोव्हेंबरपर्यंत माहिती देण्यास सांगण्यात आले असल्याचे या नोटीसमध्ये दिसते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Skybus : हवेतून धावणाऱ्या बसची गडकरींकडून पाहणी, शारजातील कंपनीला भेट; वाहतूक कोंडी कमी करण्याचा पर्याय

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT