FIFA Women’s World Cup 
क्रीडा

FIFA Women’s World Cup : मुलीने देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला अन् वडिलांनी घेतला अखेरचा श्वास

Kiran Mahanavar

FIFA Women’s World Cup Olga Carmona father's death : स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने रविवारी देदीप्यमान कामगिरी केली. त्यांनी इंग्लंडवर १-० असा विजय मिळवत पहिल्यांदाच महिला विश्‍वकरंडक फुटबॉल या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. ओल्गा कॅरमोना हिने २९व्या मिनिटाला गोल करीत स्पेनच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

पण तिला सामन्यानंतर कळले की तिचे वडील आता या जगात नाहीत. स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने सोमवारी सांगितले की, कार्मोनाचे वडील आजारी होते आणि अखेरचा श्वास घेतला आहे. मृत्यूच्या कारणांची सविस्तर माहिती संघाने दिली नाही.

वडिलांचे निधन झाल्यानंतर कार्मोनाने ट्विटर वर लिहिले की, “खेळ सुरू होण्यापूर्वी माझ्यासोबत माझा स्टार होता. मला माहित आहे की तुम्ही मला काहीतरी विशेष साध्य करण्यासाठी सक्षम केले आहे. मला माहित आहे की आज रात्री तू मला पाहत आहेस आणि तुला माझा अभिमान आहे. तुमच्या आत्म्याला शांती लाभो बाबा.

स्पेन - इंग्लंड यांच्यामधील अंतिम लढत सिडनी येथील फुटबॉल स्टेडियममध्ये पार पडली. या लढतीला फुटबॉलप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला. या लढतीला ७५ हजार ७८४ प्रेक्षकांची उपस्थिती होती. स्पेनची कर्णधार ओल्गा कॅरमोना हिने पूर्वार्धात गोल करीत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र दोन्ही देशांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे ओल्गा हिचा गोलच निर्णायक ठरला. स्पेनच्या संघाने विश्‍वकरंडकातील तिसऱ्याच प्रयत्नात विश्‍वविजेता होण्याचा मान संपादन केला, ही वाखाणण्याजोगी बाब.

इंग्लंडच्या संघाने या स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवला. मागील ३९ लढतींमधील हा त्यांचा दुसराच पराभव ठरला. मागील वर्षी इंग्लंडने जर्मनीला नमवत युरो स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे विश्‍वकरंडकाच्या अजिंक्यपदासाठीही त्यांच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून बघितले जात होते. इंग्लंडच्या महिला संघाने या स्पर्धेच्या साखळी फेरीत तिन्ही लढतींमध्ये विजय मिळवून शानदार सुरुवात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NZ beat SA in SF : दक्षिण आफ्रिका 'Chokers'! न्यूझीलंडचा T20 World Cup फायनलमध्ये प्रवेश, फिन'टॅस्टीक' शतक

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT