olympian Indian wrestler Sushil Kumar
olympian Indian wrestler Sushil Kumar  news agency
क्रीडा

नायक नहीं खलनायक है तू...

सुशांत जाधव

दोस्तीत कुस्ती करायची पण आखाड्याबाहेर शिस्तीत राहायचं ही शिकवण प्रत्येक वस्ताद आपल्या पठ्ठ्याला देत असतो. हा एक प्रामाणिक खिलाडीवृत्तीचा नियम. (Wrestling Spirit) पण आपल्याकडे नियम मोडायसाठीच असतात. पैलवान त्याला अपवाद कसे असणार. (हे सर्व कुस्तीपटूंना लागू होत नाही) ताकदीचा माज आणि अहंकार याला जो पैलवान (Wrestler) बळी पडतो त्यातून गटातटाची भानगड जन्माला येते. माझ्यासारखा मीच... हा 'मी'पणा खिलाडीवृत्तीला गिळंकृत करुन टाकतो. यातूनच जन्माला येतो सुशील कुमारसारखा मल्ल. (Olympian Indian Wrestler Sushil Kumar Hero to Villain Journy)

आखाड्यात आपल्या डावाने प्रतिस्पर्ध्याला पेचात टाकणारा सुशील कुमार गेल्या काही वर्षांपासून कामगिरीपेक्षा आखाड्याबाहेरील डावपेचाने चर्चेत राहिला. जो कुस्तीपटू त्याला गुरु मानायचा त्याच्या हत्येच्या आरोपाखाली सुशील कुमार पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. 2006 मध्ये सुशील कुमारने दोहा येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत चमकदार डाव टाकला. या स्पर्धेतील कांस्य पदकानंतर त्याने रौप्य आणि सुवर्ण पदकाची कमाई करुन कुस्ती क्षेत्रात आपली जादू निर्माण केली. कुस्तीमध्ये दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला रेसलर आहे.

देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केल्यानंतर अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या सुशील कुमारला अंहकाराने चित केल्याचे पाहायला मिळत आहे. कोणत्याही क्रीडा क्षेत्रात एखाद्या खेळाडूच्या दबदब्याचा एक काळ असतो. सुशील कुमारचाही तो होता. पण त्याला ते मान्य नव्हते. यातून त्याची अखिलाडूवृत्ती जगजाहिर झाली. आपल्याकडे बघत आखाड्यात तयार होणारा नवा मल्लाच्या यशाने अस्वस्थ होणारा पैलवान असा ठपकाही त्याच्यावर पडलाय. अनेक पैलवान सुशील कुमारसारखी कामगिरी करुन आखाडा गाजवण्याची स्वप्ने बघायची. पण सुशील अशा पैलवानांना प्रोत्साहन देण्याऐवजी सुशील त्यांच्या विरोधात रडीचा डाव खेळायचा. यातूनच अनेक सामन्यात त्याला वॉकवोव्हर मिळाले. रडीच्या डावातून मिळालेला विजयानं त्याने स्वत: आपल्यातील पैलनावगिरीची हत्याच केली.

नरसिंग यादव विरोधात केलेल्या कटकारस्थान आणि आखाड्यातील नव्या पीढीवरील दादागिरी करण्याच्या फंदात बदनाम झालेल्या आखाड्यातील नायकाची अवस्था आज एखाद्या खलनायकासारखी झालीये. त्याला आदर्श मानणाऱ्या पैलवानांसह कुस्ती शौकिनांच्या ओठावर जर संजूबाबाच्या चित्रपटातील...

नायक नहीं खलनायक है तू...

ज़ुल्मी बड़ा दुःखदायक है तू

इस प्यार की तुझको क्या कदर

इस प्यार के कहा लायक है तू .... हे गाणं आलं तर नवल वाटणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT