Sushil Kumar Case 
क्रीडा

Sushil Kumar Case : कुस्तीपटू सुशील कुमारवर आरोप निश्चित, हत्येसह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल

सागर हत्या प्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमारसह १८ जणांवर आरोप निश्चित

Kiran Mahanavar

Sushil Kumar Case : कुस्तीपटू सागर धनकर हत्या प्रकरणात दिल्ली न्यायालयाने ऑलिम्पियन सुशील कुमार आणि इतर 17 जणांविरुद्ध अनेक कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत. सुशीलसह 18 जणांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दंगल, बेकायदेशीर सभा आणि गुन्हेगारी कट रचणे आदी कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर न्यायालयाने दोन फरार आरोपींवरही आरोप निश्चित केले आहेत.

4 मे 2021 रोजी सागर धनकर नावाच्या कुस्तीपटूला छत्रसाल स्टेडियम दिल्लीत बेदम मारहाण करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडिओ समोर आला होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी अथक परिश्रमानंतर कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली होती. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती. सध्या दिल्ली न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारसह 20 जणांना आरोपी बनवले आहे. त्यापैकी 18 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात सुमारे 170 पानांचे आरोपपत्र असून त्यात 1000 पानांचे संलग्नीकरण आहे. म्हणजेच एकूण 1100 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT