Neeraj Chopra  sakal
क्रीडा

Neeraj Chopra : ऑलिंपिक विजेता नीरज ओमेगाचा सदिच्छादूत

ऑलिंपिक व विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला स्वित्झर्लंडमधील घड्याळाचा लक्झरी ब्रँड असलेल्या ओमेगा कंपनीचा सदिच्छादूत बनविण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ऑलिंपिक व विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला स्वित्झर्लंडमधील घड्याळाचा लक्झरी ब्रँड असलेल्या ओमेगा कंपनीचा सदिच्छादूत बनविण्यात आले आहे. यंदाच्या पॅरिस ऑलिंपिकमधील विविध खेळांसाठी आवश्यक असलेल्या वेळेची नोंद ठेवण्यासाठी ओमेगाची अधिकृत टाईमकीपर म्हणून निवड करण्यात आली आहे.

उद्या, शुक्रवारी दोहा येथे डायमंड लीग स्पर्धा होत असून त्यात नीरज भाग घेत आहे. त्यापूर्वी नीरजने दोहा येथील ओमेगाच्या शोरूमला भेट दिली. ‘‘ऑलिंपिकमध्ये टाईमकिपींग म्हणून कार्य करणाऱ्या या प्रसिद्ध ब्रँडचा हिस्सा झालो, याबद्दल अतिशय आनंदी आहे.

अतिशय आनंदी आहे. ओमेगासोबतचा माझा सहवास अधिक चांगला होईल, अशी मला आशा आहे,’’ असे नीरज म्हणाला. ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला आशियाई ॲथलिट होय.

ओमेगा कंपनी १९३२च्या लॉस एंजल्स ऑलिंपिकपासून आतापर्यंत प्रत्येक स्पर्धेत टाईमकीपर म्हणून सेवा देत आहे. ही त्यांची ऑलिंपिकमध्ये सेवा देण्याची ३१वी वेळ असून ॲथलेटिक्स आणि जलतरण या दोन खेळांत त्यांची विशेष चमू तंत्रज्ञानाने विशेष करून सज्ज असते. दोहा येथे सहभागी झाल्यानंतर नीरज थेट भुवनेश्वर येथे फेडरेशन करंडक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दाखल होणार आहे. या निमित्ताने तो तब्बल तीन वर्षांनंतर मायदेशातील स्पर्धेत सहभागी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लक्ष्मण बांदल; शशिकांत शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

Latest Marathi News Update : पुण्यात बी. जे. मेडिकल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु

Bangladesh Onion Export : कांद्याच्या बाजारात नवा खेळाडू, श्रीलंकेसाठी बांगलादेशाची निर्यात तयारी; भारतीय कांद्यासमोर नवे आव्हान

SCROLL FOR NEXT