Kolhapur Sports Club sakal
क्रीडा

Kolhapur Sports Club : ‘ॲम्बिशिअस’चे ट्रायथलॉनमध्ये यश

कोल्हापूर येथे स्पर्धा; निर्धारित वेळेपूर्वी सहभागींनी केले निकष पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबमार्फत लोहपुरुष (आयर्नमॅन), ऑलिंपिक डिस्टन्स ट्रायथलॉन व ड्युएथलॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीतील ॲम्बिशिअस एंड्यूरन्स क्लबच्या ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला. ॲम्बिशिअस एंड्यूरन्स क्लबचे आयर्नमॅन कोच किरण साहू यांनी मार्गदर्शन केले.

चार महिने सर्व स्पर्धक साहू यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होते. विशेष म्हणजे ॲम्बिशिअस एंड्यूरन्स क्लब ट्रायथलॉन स्पर्धेचे मार्गदर्शन करणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. निर्धारित वेळेपूर्वी सर्वांनी स्पर्धा पूर्ण करून प्रशस्तिपत्र व पदक प्राप्त केले.

सांगलीकारांसाठी अभिमानाची बाब म्हणजे लोहपुरुष स्पर्धेमध्ये ३१ ते ४५ वयोगटांमध्ये राहुल शिरसाट यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांनी १.९ किलोमीटर पोहणे, नंतर ९० किलोमीटर सायकलिंग व २१ किलोमीटर धावणे हे पाच तास चार मिनिटांत पूर्ण केले. ऑलिंपिक डिस्टन्स ट्रायथलॉनमध्ये ४५ वर्षांवरील वयोगटात मनोज देसाई यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. १.५ किलोमीटर पोहणे, ४० किलोमीटर सायकलिंग व दहा किलोमीटर धावणे हे अंतर तीन तास १८ मिनिटांत पूर्ण केले.

ड्युएथलॉन या स्पर्धेमध्ये अमित शिरगुप्पे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. ५ किलोमीटर धावणे, २० किलोमीटर सायकलिंग व परत दोन किलोमीटर धावणे दोन तास दोन मिनिटांत पूर्ण केले. नीलेश भोसले, अतहर जमादार, नवनाथ इंदलकर, विनोद मगदूम, दीपक माळी, अक्षय आवटी, शीतल नवले, शरद कुंभार, नीतेश बसरगे, विनोद खोत, संजय चव्हाण, केदार केळकर, दीपक पट्टणशेट्टी, प्रेम राठोड, अमित सोनवणे, हेमंत पाटील, राहुल साठे, प्रसन्न करंदीकर, सुधीर भगत, ओंकार लोहाना, अश्विन कोळी, सचिन पवार, आदित्य कपिलेश्वर, स्वरूप बसरगे, रणजित विपट, विशाल पाटील, अक्षय कुलकर्णी, प्रवीण मोहनानी, रवी साळुंखे, दत्ता बागडे, किशोर माने व डॉ. प्रणव पाटील यांनी स्पर्धा पूर्ण केली. कोल्हापूर येथील राजाराम तलाव येथे स्पर्धा झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात व दिल्ली राज्यातून स्पर्धक सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT