Olympic medalist boxer Lovlina Borgohain alleges mental harassment esakal
क्रीडा

Lovlina Borgohain : ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लोव्हलिनाने मानसिक छळाचा केला आरोप

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेती लोव्हलिना बोरगोहैनने (Lovlina Borgohain) मानसिक छळाचा (Mental Harassment) आरोप केला आहे. तिने तिचा राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचा सराव राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आठ दिवस आधीच बंद केल्याचे सांगितले.

लोव्हलिनाने सोशल मीडियावर एक वक्तव्य प्रसिद्ध केले. ती म्हणते की, 'आज मला खूप दुःख झाले आहे. माझा छळ होत आहे. ज्या प्रशिक्षकांनी मला ऑलिम्पिक पदक जिंकण्यास मदत केली त्यांना सारखे सारखे काढून टाकत माझ्या सरावात अडथळे निर्माण केले जात आहेत.याद्वारे माझी छळवणूक सुरू आहे.'

लोव्हलिना पुढे म्हणाली की, 'या प्रशिक्षकांपैकी एक संध्या गुरूंगजी यांना द्रोणाचार्य पुरस्कार देखील मिळाला आहे. माझ्या दोन्ही प्रशिक्षकांना सराव शिबिरात बऱ्याच जणांचे पाय पकडल्यानंतर सामिल करून घेण्यात आले. मला या सरावात खूप अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे मानसिक छळ तर होतोच. संध्या यांना राष्ट्रकुल स्पर्धेच्या ठिकाणी देखील प्रवेश मिळत नाहीये. त्यांना माघारी पाठवण्यात आले आहे. मी विनंती करून देखील हे झाले आहे.'

लोव्हलिनने खेळातील राजकारणावर देखील निशाना साधला. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, 'कळत नाहीये की मी खेळावर कसे लक्ष केंद्रीत करू. या राजकारणामुळेच माझी गेली वर्ल्ड चॅम्पियनशिप देखील खराब गेली होती. या राजकारणामुळे आता मला राष्ट्रकुल स्पर्धा देखील खराब करायची नाहीये. राजकारणाला छेद देत मी माझ्या देशासाठी पदक जिंकेन अशी आशा आहे जय हिंद.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT