Indian Westler Khashaba Dadasaheb Jadhav esakal
क्रीडा

ऑलिंपिकवीर खाशाबांचा 'जन्मदिन' आता 'क्रीडा दिन' म्‍हणून साजरा होणार; प्रत्येक जिल्ह्याला मिळणार 75 हजार रुपये

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्‍हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

सकाळ डिजिटल टीम

मंत्रालयातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे कार्यासन अधिकारी रणसिंग डेरे यांच्या स्‍वाक्षरीने काल (शुक्रवार) सायंकाळी हा अध्‍यादेश काढण्यात आला आहे.

सातारा : जिल्ह्याचे सुपुत्र आणि देशाला वैयक्तिक प्रकारात पहिले ऑलिंपिक पदक (Olympic Medal) देणारे खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांचा १५ जानेवारी हा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन (State Sports Day) म्‍हणून साजरा होणार आहे. या राज्य क्रीडा दिनाच्‍या कार्यक्रमांसाठी प्रत्येक जिल्ह्याला ७५ हजार रुपये, तर राष्ट्रीय क्रीडा दिनासाठी आता ५० हजार आणि क्रीडा सप्ताहासाठी १० हजारांऐवजी एक लाखाचे अनुदान देण्यात येणार आहे.

याबाबत कवठे (ता. वाई) येथील सुपुत्र, मंत्रालयातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे कार्यासन अधिकारी रणसिंग डेरे यांच्या स्‍वाक्षरीने काल (शुक्रवार) सायंकाळी हा अध्‍यादेश काढण्यात आला आहे. पुणे येथील शिवछत्रपती पुरस्कार वितरण समारंभात २८ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्‍हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

त्यावर आज अध्‍यादेश काढण्यात आला. हा क्रीडा दिन क्रीडा व युवक, संचनालय, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडा संकुले, प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालये, शासकीय तसेच खासगी विद्यापीठे, क्रीडा संस्‍था, मंडळे अकादमी, क्रीडा योजनांचा लाभ घेणाऱ्या संस्थांमध्ये साजरा केला जाणार आहे. खाशाबा जाधव यांच्या योगदानावर व्याख्यान, क्रीडा रॅली, मॅरेथॉन, मार्गदर्शन शिबिर, खेळाडूंशी संवाद, क्रीडा पुरस्काराचे वितरण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, क्रीडा उपक्रमांचे आयोजन यामध्‍ये करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT