olympic medalist sushil kumar give fitness and wrestling coaching tihar jail
olympic medalist sushil kumar give fitness and wrestling coaching tihar jail  
क्रीडा

ऑलिम्पिक विजेता सुशील कुमार तुरुंगात कैद्यांना देतोय फिटनेसचे धडे

Kiran Mahanavar

नवी दिल्ली : दोन वेळचा ऑलिम्पिक विजेता सुशील कुमार, जो सध्या सागर धनखर हत्येप्रकरणी देशाच्या राजधानीच्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे, सुशील कुमारने नवी जबाबदारी स्वीकारली आहे. त्याने तुरुंगातील इतर कैद्यांना कुस्ती आणि शारीरिक तंदुरुस्तीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुशीलला तुरुंग प्रशासनाची परवानगीही मिळाली आहे.

तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी सांगितले की, सुशील कुमार यांना कैद्यांना कुस्ती शिकवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या सहा ते सात कैद्यांना सुशील कुमार यांच्याकडून कुस्तीचे प्रशिक्षण दिले जात आहे.

सुशील कुमारला क्रीडा उपक्रमात सहभागी करून घेण्याची योजना यापूर्वी तयार करण्यात आली होती. मात्र नंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ते थांबवण्यात आले होती.

23 मे 2021 रोजी सागर धनखरच्या हत्येप्रकरणी सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजय कुमार यांना अटक करण्यात आली होती. सुशील कुमार हा प्रशिक्षित व्यावसायिक कुस्तीपटू असल्याने तुरुंगातील सर्व कैदी त्याच्याकडून फिटनेस आणि कुस्तीचे वर्गही घेतील, असे तुरुंग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT