Aman Sehrawat sakal
क्रीडा

Aman Sehrawat : अमनकडून ऑलिंपिक कोटा ; जागतिक पात्रता फेरीत बाजी

अमन सेहरावत याने शनिवारी मध्यरात्री दमदार कामगिरी केली. त्याने जागतिक पात्रता फेरीतील पुरुषांच्या फ्रीस्टाईल ५७ किलो वजनी गटात भारतासाठी पॅरिस ऑलिंपिक कोटा मिळवला.

सकाळ वृत्तसेवा

इस्तंबुल : अमन सेहरावत याने शनिवारी मध्यरात्री दमदार कामगिरी केली. त्याने जागतिक पात्रता फेरीतील पुरुषांच्या फ्रीस्टाईल ५७ किलो वजनी गटात भारतासाठी पॅरिस ऑलिंपिक कोटा मिळवला. पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवणारा अमन हा भारताचा पहिलाच पुरुष कुस्तीपटू ठरला आहे. अमन सेहरावत याने २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत विजेता होण्याचा मान संपादन केला. तसेच आशियाई स्पर्धेतही तो विजेता ठरला होता. त्यामुळे जागतिक ऑलिंपिक पात्रता फेरीत त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. तीनही लढतींमध्ये त्याने दुहेरी संख्या नोंदवली. दोन लढतींमध्ये त्याने तांत्रिक सरस गुणांच्या जोरावर विजय साकारले हे विशेष.

अमन सेहरावत याने बुल्गेरियाच्या जिऑर्जी वँगलोव याच्यावर १०-४ अशी मात केली. त्यानंतर युक्रेनच्या आंद्री यातसेंको याच्यावर तांत्रिक सरस गुणांच्या जोरावर त्याने विजय मिळवला. या लढतीत त्याने प्रतिस्पर्ध्याला एकही गुण मिळू दिला नाही. अखेर महत्त्वाच्या लढतीत अमन याने उत्तर कोरियाच्या चोंग्ससाँग हॅन याचा १२-२ असा धुव्वा उडवला.

दीपक पुनियाचे अपयश

दीपक पुनियाचे टोकियो ऑलिंपिकमध्ये थोडक्यासाठी ब्राँझपदक हुकले होते. त्यामुळे यंदा पात्रता फेरीत त्याच्याकडून आशा होत्या. पण पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. झुशेन लिन याच्याकडून त्याला ६-४ असे पराभूत व्हावे लागले. सुरुवातीला आघाडी घेतल्यानंतरही दीपकला हार पत्करावी लागली.

रवी दहियाविरुद्ध लढावे लागणार?

रवी दहिया याने ५७ किलो वजनी गटात टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकावले होते. आता अमन सेहरावत याने ५७ किलो वजनी गटातच पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवला आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती संघटनेकडून ५७ किलो वजनी गटाची चाचणी घेण्यात आल्यास अमन - रवी यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत दोघांमधील विजेता पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश करील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

SCROLL FOR NEXT